शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Election: अखेर ठरलं! पाऊस संपताच निवडणुकीचा धुरळा, महापालिकेची ३१ मे रोजी आरक्षण सोडत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 11:45 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील पाऊस लक्षात घेता ही निवडणूक ऑक्टोबरनंतर होईल असा एक अंदाज बांधण्यात येत होता; परंतु राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी राज्यातील कोल्हापूरसह तेरा महानगरपालिकांना दिलेल्या निर्देशानुसार ही निवडणूक पाऊस संपताच कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक कधी होणार याबाबत संभ्रम असतानाच राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार मंगळवार, दि. ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता येथील केशवराव भोसले नाट्यगृहात प्रभाग आरक्षण सोडत काढण्याची पालिका प्रशासनाने तयारी सुरू केली.

ज्या महानगरपालिका क्षेत्रात पाऊस कमी आहे तेथे तातडीने निवडणूक प्रक्रिया सुरू करावी आणि जेथे पाऊस जास्त आहे तेथे दुसऱ्या टप्प्यात म्हणजे पाऊस संपल्यानंतर निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत, त्यानुसार आयोगाकडून तयारी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सोमवारी जाहीर केला.

कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक दिवाळीनंतर होणार की पावसाळा संपताच लगेच होणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती; परंतु अधिकृत अशी माहिती कोणाकडेही नव्हती. नागरिकांसह खुद्द महापालिका अधिकारीही संभ्रमात होते. कोल्हापूर जिल्ह्यातील पाऊस लक्षात घेता ही निवडणूक ऑक्टोबरनंतर होईल असा एक अंदाज बांधण्यात येत होता; परंतु राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी राज्यातील कोल्हापूरसह तेरा महानगरपालिकांना दिलेल्या निर्देशानुसार ही निवडणूक पाऊस संपताच कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे.

ओबीसीशिवाय आरक्षण सोडत

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द झाले आहे. त्यामुळे ही आरक्षण सोडत ओबीसींना वगळून होणार आहे. नगरसेवक पदाच्या ९२ जागांमध्ये ओबीसींना २७ टक्के याप्रमाणे २५ जागा मिळणार होत्या. परंतु, आता ओबीसीचे आरक्षण असणार नाही.त्यामुळे ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवावी लागणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना या राजकीय पक्षांनी ओबीसी उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक झाली तर ती एक ऐतिहासिक घटना असेल.

प्रक्रिया अशी असेल..

  • अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, सर्वसाधारण महिला यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्याकरिता सोडत काढण्याची नोटीस शुक्रवारी (दि २७ मे) प्रसिद्ध करण्यात येणार.
  • प्रत्यक्ष आरक्षण सोडत ही मंगळवारी (३१ मे) काढणार.
  • सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप दि. १ जूनला प्रसिद्ध.
  • दि. १ ते ६ जूनअखेर प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत
  • सर्व हरकती व सूचनांचा विचार करून प्रभागनिहाय अंतिम आरक्षण १३ जूनला शासन राजपत्रात प्रसिद्ध होणार.
  • ही प्रक्रिया एकदा पूर्ण झाल्यावर आयोग निवडणूक कार्यक्रम जाहीर करू शकते. तो साधारणपणे ३५ ते ४५ दिवसांचा असतो. 

असे असेल आरक्षण

  • एकूण जागा - ९२, वॉर्ड ३१
  • सर्वसाधारण महिला- ४०
  • सर्वसाधारण पुरुष - ३९
  • अनुसूचित जाती महिला ६
  • अनुसूचित जाती पुरुष ६
  • अनुसूचित जमाती महिला- पुरुष १ 

४६ पुरुष, ४६ महिलामहापालिकेच्या नवीन सभागृहात ४६ महिला व ४६ पुरुष नगरसेवक असतील. अनुसूचित जमातीसाठी एक जागेचे आरक्षण आहे. ही जागा पुरुषांसाठी आरक्षित झाली तर सर्वसाधारण प्रवर्गातून पुुरुषासाठीची एक जागा कमी होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक