शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

मोठ्या ध्वनी यंत्रणेमुळे कान झाला बाद; कोल्हापुरातील राजू ढवळे दहा वर्षांपासून भोगताहेत बहिरेपणाची फळे

By संदीप आडनाईक | Updated: September 12, 2024 12:58 IST

मिरवणुकीतील ध्वनी यंत्रणेचा आवाजामुळे अनेकांच्या आरोग्यावर परिणाम

संदीप आडनाईककोल्हापूर : सामान्यत: ७० ते ८० डेसिबलचा आवाज सात ते आठ तास कामावर पडला तरी मानवी श्रवण यंत्रणा ती सहन करू शकते, मात्र ११० किंवा त्यापेक्षा अधिक डेसिबलच्या आवाजाने बहिरेपणा येतो. गणेशोत्सवातील मिरवणुकीतील ध्वनी यंत्रणेचा आवाज ११० ते १७० डेसिबलचा असल्याने मिरवणुकीनंतर अनेकांच्या आरोग्यावर परिणाम हाेत असल्याचे हळूहळू उघड होत आहे. या आवाजामुळे पाच टक्के रुग्ण बहिरे होतात, तर दोन टक्के रुग्णांना हृदयविकार जडतो. आता लेसर किरणांच्या माऱ्यामुळे दृष्टीही गमावल्याची उदाहरणे समोर येत आहेत.कोल्हापुरातील रविवार पेठेत राहणारे बांधकाम व्यावसायिक राजू ढवळे हे आज ५८ वर्षांचे आहेत. दहा वर्षांपूर्वी जेव्हा गणेश मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजातील ध्वनियंत्रणेचे नव्याने फॅड सुरू झाले होते, तेव्हा ढवळे यांच्या कानावर त्याचा आघात झाला. तेव्हा उमा टॉकीज ते आझाद चौक या मार्गावरून गणेश मिरवणूक काढण्यात येत असे. काॅमर्स कॉलेजजवळ, तसेच सिग्नलला मिरवणुका थांबून राहत. या मार्गावर विजेच्या मोठ्या तारा असत. त्या काढेपर्यंत वाद्यांचा दणदणाट सुरूच असायचा. तेव्हा ही यंत्रणा नवी होती, उत्सुकता म्हणून अनेकजण त्याचा आनंद घेत होते, परंतु यानंतर माझ्या दोन्ही कानांना अचानक ऐकायला येणे बंद झाले.कोल्हापूर, नंतर इस्लामपूर, पुणे आणि मुंबईत वर्षभर उपचार घेतले. शेवटी जर्मनीतील एका डॉक्टरने मुंबईत माझ्या उजव्या कानावर शस्त्रक्रिया केली. त्याकाळी यासाठी साडेतीन लाख रुपये खर्च आला. गेल्या आठवड्यात आगमन मिरवणुका सुरू होत्या. परंतु, त्या पूर्ण होईपर्यंत मी जागेवरच थांबून राहिलो. विज्ञान प्रबोधिनीसारख्या संघटनेशी जोडला गेला आहे, दुसऱ्याला याचा मिरवणुकांचा त्रास होऊ नये यासाठी जनजागृती करतोय.

माझ्या एका कानाने ऐकू येत नाही. त्याचा माझ्या जीवनशैलीवर फरक पडला. नोकरीवर परिणाम झाला. दुचाकी चालवणे पूर्णपणे बंद झाले आहे. मोबाईलची रिंग समजते, पण तो कोठे ठेवलाय याची दिशा समजत नाही. कानातून अजूनही विचित्र आवाज येत असतात. टीव्हीचा आवाज, पावसाचा, वर्तमानपत्राचा आवाज तसेच दातावर दात जरी आपटला तरी पाचपट मोठा आवाज ऐकू येतात. - राजू ढवळे, रविवार पेठ.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGanpati Festivalगणेश चतुर्थी २०२४Healthआरोग्य