शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात राजारामपुरीतील गणेश आगमन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट, रशियन डीजेचे आकर्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 13:16 IST

मिरवणूक पाहण्यासाठी तरुणाईची मोठी गर्दी, झगमगाटही वाढला

कोल्हापूर : पोलिसांनी वारंवार केलेल्या आवाहनाला बगल देत गणेश मंडळांनी मंगळवारी (दि. १९) रात्री राजारामपुरीतील गणेश आगमन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट केला. सुमारे सहा तास चाललेल्या मिरवणुकीतील आवाजाने परिसरातील नागरिकांचे कान गच्च झाले, तर डोके बधिर झाले. प्रचंड उत्साहात निघालेली मिरवणूक पाहण्यासाठी तरुणाईने गर्दी केली.गणेश आगमनाच्या मिरवणुकीत मंडळांनी आवाजमर्यादेचे पालन करावे, तसेच लेसर किरणांचा वापर टाळावा, असे आवाहन पोलिसांनी केले होते. शिवाय स्ट्रक्चरची उंची आणि रुंदी मर्यादित ठेवण्याच्या सूचनाही मंडळांना केल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र आगमनाच्या मिरवणुकीत बहुतांश मंडळांनी पोलिसांच्या सूचनांना फाटा देऊन डीजेच्या प्रचंड दणदणाटात मिरवणूक काढली. सायंकाळी पाचच्या सुमारास सुरू झालेली मिरवणूक मध्यरात्रीपर्यंत सुरू होती. डीजेच्या कान गच्च करणाऱ्या आवाजासोबतच विद्युत रोषणाई, शार्पी आणि लेसरच्या किरणांनी राजारामपुरीतील प्रमुख दोन रस्ते उजळून निघाले. डीजेच्या ठेक्यावर ताल धरत मंडळांनी प्रचंड जल्लोष केला. यात तरुणींचाही मोठा सहभाग होता. मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. राजारामपुरी, विक्रमनगर, टेंबलाईवाडी येथील ४३ मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला.

विद्युत पुरवठा खंडितमंडळांचे स्ट्रक्चर अवाढव्य असल्याने विद्युततारांना स्पर्श होऊन दुर्घटना होऊ नये, यासाठी महावितरणने मिरवणुकीच्या काळात राजारामपुरीतील विद्युत पुरवठा खंडित केला. मंडळांच्या विद्युत रोषणाईने आसमंत उजळून निघाला.

पावसाची रिमझिम अन् उत्साहाला उधाणसायंकाळी काही वेळ पावसाने हजेरी लावली. अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी झेलत मंडळांनी मिरवणूक सुरू ठेवली. रात्री उशिरापर्यंत उत्साहाला उधाण कायम होते.

कडेकोट बंदोबस्तआगमन मिरवणुकीसाठी पोलिसांनी राजारामपुरीत कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. दुपारपासूनच या परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मिरवणूक मार्गावर फिरून पाहणी केली. शहर उपअधीक्षक अजित टिके, निरीक्षक तानाजी सावंत, अनिल तनपुरे, महादेव वाघमोडे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. पोलिसांच्या हाती ध्वनिमापक यंत्रे मात्र कुठेच दिसली नाहीत.

पारंपरिक वाद्यांना बगल, रशियन डीजेचे आकर्षणआगमनाच्या मिरवणुकीत यंदा मंडळांनी पारंपरिक वाद्यांना बगल देऊन डीजे आणि विद्युत रोषणाईला प्राधान्य दिले. काही मोजक्या मंडळांनीच ढोलपथकांसोबत मिरवणुकीत सहभाग घेतला. राजारामपुरी पहिली गल्ली मंडळाने आणलेल्या रशियन डीजेच्या तालावर थिरकण्यासाठी तरुणाईने प्रचंड गर्दी केली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर