शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील ‘शाहू सांस्कृतिक’ सभागृह ढासळण्याच्या मार्गावर, लाखोंच्या उत्पन्नावर पाणी सोडण्यामागे गौडबंगाल काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 11:51 IST

इमारतीवर काहींचा डोळा..

कोल्हापूर : बाजार समितीचे शाहू सांस्कृतिक मंदिर अखेरची घटका मोजू लागले आहे. दोन वर्षांपूर्वीच डागडुजी करून त्याचा वापर सुरू झाला असता तर वर्षाला लाखो रुपयांचे उत्पन्न त्यातून समितीला मिळाले असते. पण, संचालक मंडळाच्या मनात काही वेगळेच असून ही इमारत ढासळण्याची वाट पाहत आहे की काय? अशी चर्चा सध्या सुरू आहे.कोल्हापूर शहरातील सर्वात मोठे व जास्त आसन क्षमता असलेले एकमेव शाहू सांस्कृतिक मंदिर हे मार्केट यार्ड येथे आहे. प्रशस्त पार्किंग, एक हजार आसन क्षमता असल्याने यातून समितीला चांगले उत्पन्न मिळत होते. पण, समितीच्या तत्कालीन संचालकांनी त्याचा वार्षिक एक लाख रुपये भाड्यावर अक्षरश: बाजार केला होता. पंचरत्न कंपनीशी केलेला करार अडीच वर्षापूर्वी संपल्यानंतर ही इमारत समितीच्या ताब्यात आली. पंचरत्न कंपनीने ताबा सोडताना येथे जाहीर कार्यक्रम व्हायचे, पण समितीच्या ताब्यात आल्यानंतर ही इमारत वापरण्यास योग्य नसल्याची भीती संचालकांना वाटू लागली. ताब्यात घेतल्यानंतर किरकोळ डागडुजी करून इमारत वापरण्यास घेतली असती तर त्यातून उत्पन्न सुरू झाले असते.इमारतीवर काहींचा डोळा..कोल्हापूर शहराजवळ व मुख्य रस्त्याला लागून एवढी प्रशस्त जागा असल्याने या इमारतीवर काहींचा डोळा आहे. काही मंडळींनी हालचालीही सुरू केल्या आहेत, कदाचित त्यामुळेच ही इमारत जमीनदोस्त होण्याची वाट पाहिली जात आहे का, असा प्रश्नही उपस्थित होते आहे.

दृष्टिक्षेपात शाहू सांस्कृतिक इमारत..

  • जागा - दोन एकर (सभागृह, जेवण विभाग, पार्किंग)
  • इमारतीची बांधकाम - १९७४
  • आसन क्षमता - १ हजार खुर्च्या
  • पंचरत्न कंपनीला भाडेतत्त्वावर दिले - २००१
  • कंपनीकडून समितीकडे हस्तांतर - ऑक्टाेबर २०२२
टॅग्स :kolhapurकोल्हापूर