शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: वर्दीतली माणुसकी!, अपघातातील गंभीर जखमीला पोलिस वाहनाने तातडीने उपचारासाठी नेले

By राजाराम लोंढे | Updated: September 16, 2024 19:06 IST

कोल्हापूर : सकाळी पावणे अकराची वेळ. कागल- कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर एका पेट्रोल पंपाजवळ आयशर ट्रकने दिलेल्या धडकेत अज्ञात पादचारी ...

कोल्हापूर : सकाळी पावणे अकराची वेळ. कागल-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर एका पेट्रोल पंपाजवळ आयशर ट्रकने दिलेल्या धडकेत अज्ञात पादचारी गंभीर जखमी झाला. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला पोलिस वाहनाने तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी दाखवलेल्या माणुसकीचे कौतूक होत आहे. दरम्यान, अपघातग्रस्त आयशर कंटेनर एका बाजूला घेत महामार्गाची वाहतूक सुरळीत केली.अज्ञात पादचारी रस्ता ओलांडताना कागलकडून कोल्हापूरकडे जाणाऱ्या आयशर कंटेनर ट्रक (HR38 AF 9234) ने जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झाला व बेशुद्ध पडला. अपघाताची माहिती मिळतात उजळाईवाडी महामार्ग पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यराज घुले, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप जाधव, हेडकॉन्स्टेबल जावेद गडकरी, आकाश पाटील, ग्रेड पी.एस.आय. दीपक ठोंबरे आदी सहकाऱ्यांसह घटनास्थळी तात्काळ पोहोचले. जखमीला हायवे पेट्रोलिंगचे पोलिस वाहन क्र. (MH09 FQ 6308) मधून रुग्णालयात दाखल केले.  

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातPoliceपोलिस