शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- फुलेवाडी खून प्रकरण: ऋषिकेशच्या खुनातील सहाव्या आरोपीचा शोध सुरु, हल्लेखोराचे नाव निष्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 12:35 IST

गुन्ह्यात संशयितांनी वापरलेली शस्त्रे जप्त 

कोल्हापूर : फुलेवाडी परिसरात पाठलाग करून गुंड ऋषिकेश रवींद्र नलवडे (वय २४, रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) याचा खून केल्याप्रकरणी आणखी एका हल्लेखोराचे नाव निष्पन्न झाले. विशाल गायतडे (रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) असे सहाव्या संशयिताचे नाव असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. या गुन्ह्यात संशयितांनी वापरलेली शस्त्रे कळंबा तलाव परिसरातून पोलिसांनी जप्त केली.पूर्व वैमनस्यातून सहा जणांनी फुलेवाडी परिसरात सोमवारी (दि. १३) रात्री गुंड ऋषिकेश नलवडे याचा पाठलाग करून धारदार शस्त्राने १६ वार करून खून केला होता. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी वसीम ऊर्फ मॅसी लियाकत जमादार (वय ३०, रा. टिंबर मार्केट, कोल्हापूर) आणि आनंद बबन येडगे (वय २०, रा. राजारामपुरी) यांना अटक केली, तर तीन अल्पवयीन हल्लेखोरांना ताब्यात घेऊन त्यांची बालसुधारगृहात रवानगी केली.अटकेतील दोघांच्या चौकशीत सहावा हल्लेखोर विशाल गायतडे याचे नाव निष्पन्न झाल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. गायतडे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत असून, त्याच्यावर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

नलवडे याच्या खुनानंतर पळालेल्या हल्लेखोरांनी त्यांच्याकडील दोन तलवारी, एक एडका आणि एक सत्तूर कळंबा तलाव परिसरात टाकला होता. पोलिसांनी हल्लेखोरांना त्या परिसरात फिरवून गुन्ह्यातील शस्त्रे जप्त केली. अटकेतील जमादार आणि येडगे यांची पोलिस कोठडी आज, सोमवारी संपत असून त्यांना न्यायालयात हजर केले जाईल, अशी माहिती तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक रूपाली पाटील यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी