शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

वर्ष उलटले; 'नकोशी' च्या आई वडिलांचा शोध सुरुच; कोल्हापुरातील कसबा बावड्यात सापडली होती कचऱ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 17:02 IST

दीपक जाधव कदमवाडी : कोल्हापुरात गेल्यावर्षी सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्याच नियोजन सुरू असताना असे कसबा बावड्यात ...

दीपक जाधवकदमवाडी : कोल्हापुरात गेल्यावर्षी सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्याच नियोजन सुरू असताना असे कसबा बावड्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील गजबजलेल्या  एका पेट्रोल पंपाच्यासमोर रस्त्याच्या कडेला एक दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक टाकून दिल्याची खळबळजनक घटना समोर आली होती. त्या निर्दयी आई वडिलांचा शोध आज वर्ष लोटले तरी शाहुपुरी पोलिसांकडून सुरुच आहे.कसबा बावडा येथे श्रीराम सेवा सोसायटीच्या पेट्रोल पंपाच्या समोर उघड्यावर असणाऱ्यां कचरा कोडाळ्यात अंधाराचा फायदा घेऊन कोणीतरी एक दिवसाचे स्त्री जातीचे अर् टाकले होते.  सकाळी महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी कचरा उचलण्यासाठी येथे आले होते. उघड्या कोंडाळ्यातील पडलेला कचरा खोऱ्याने एकत्रित करत असताना कचऱ्यात लहान  मुलाचा रडतानाचा आवाज आल्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांनी जवळ जाऊन पाहिले.यावेळी कचऱ्यामध्ये एका कापडात गुंडाळून एक दिवसाच स्त्री जातीचे अर्भक टाकलेले निदर्शनास आले. यानंतर स्वच्छता कर्मचाऱ्यांनी त्वरित याची माहिती आरोग्य निरीक्षकांना दिली. तसेच या अर्भकाला दुसऱ्या स्वच्छ कापडामध्ये घेऊन तत्काळ सेवा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले होते. सद्या ते बाळ बालकल्याण गृहात असून त्याच्या निर्दयी आई बापाला शोधण्यात वर्षभरात पोलिसांना अपयश आले आहे.

या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक नागेश यमगर व पोलीस हवालदार संदीप पाटील यांच्याकडे होता. त्यानी कोल्हापूर आणि परिसरातील खासगी व शासकीय रुग्णालयात नोंद असलेल्या गरोदर माताची बाळंतपण झालेल्या माताची माहिती संकलीत केली व पोलिस उपनिरीक्षक नागेश यमगर यांची बदली झाली. त्यानंतर त्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक क्रांती पाटील यांच्याकडे देण्यात आल्यानंतर त्यात कोणतीही प्रगती झालेली नाही. सध्या या प्रकरणाचा तपास सुरुच आहे. नकोशीच्या निर्दयी आई-वडिलांचा शोध कधी लागणार ? हा प्रश्नच आहे.

तत्कालीन तपास अधिकारी यांची बदली झाल्यानंतर माझ्याकडे तपास आला असून सध्या आपण या मध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार कायम तपासावर असून तपास लागताच फाईल ओपन करून पुढे अधिक तपास करण्यात येईल. - क्रांती पाटील. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस