शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘सोहम’च्या शिवप्रेमाला गडहिंग्लजकरांचा सलाम; कुर्ता पेटला, तरीही खाली पडू दिला नाही भगवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 21:59 IST

सकाळी लाखेनगरातील स्वागत कमानीनजीकच्या श्री काळभैरी पादुका कट्याजवळ शिवपुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली होती.

- राम मगदूम

गडहिंग्लज- कुर्ता पेटला, पोट भाजल तरीही त्याने भगवा झेंडा हातातून खाली पडू दिला नाही. म्हणूनच तमाम गडहिंग्लजकरांनी जिद्दी सोहमच्या शिवप्रेमीला सलाम केला. सोहम सूरज गवळी (वय ११) असे त्याचे नाव असून तो येथील क्रिएटिव्ह हायस्कूलमध्ये तिसरीमध्ये शिकत आहे. शिवजयंतीनिमित्त शिवज्योत आणताना शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेची गडहिंग्लजसह परिसरात विशेष चर्चा आहे.हकीकत अशी, येथील शेंद्री रोडवरील काळभैरी फुटबॉल क्लबतर्फे दरवर्षी मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी केली जाते. त्यात परिसरातील  तरूणांबरोबरच बच्चे कंपनीदेखील मोठ्या उत्साहात सहभागी होते.

सकाळी लाखेनगरातील स्वागत कमानीनजीकच्या श्री काळभैरी पादुका कट्याजवळ शिवपुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्यानंतर मंडळाचे कार्यकर्ते शिवज्योत आणण्यासाठी गडहिंग्लजजवळच्या किल्ले सामानगडावर गेले होते. त्यावेळी सोहमदेखील वडीलांच्या रिक्षातून सोबत गेला होता. परंतु, गडावरून येताना तो गडहिंग्लजपर्यंत शिवज्योतीबरोबर धावत आला. शिवज्योत काळभैरी रोडवर पोहोचल्यानंतर ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून शिवज्योतीचे स्वागत केले.

दरम्यान, एका ठिकाणी स्वागत सुरू असताना मशालीतून उडालेली ठिणगी सोहमच्या भगव्या कुर्त्यावर पडली. कुर्त्याने पेट घेतल्यामुळे पोटाला भाजू लागल्याने त्याने आरडाओरडा केला. त्यामुळे त्याच्या कुर्त्याने पेट घेतल्याचे निदर्शनास येताच सोबतच्या तेजस बिसुरे व अथर्व केनवडेकर या मित्रांसह कार्यकर्त्यांनी तातडीने आग विझवली. दवाखान्यातील उपचारानंतर त्याला संध्याकाळी घरी आणण्यात आले. आता त्याची प्रकृती ठीक आहे.  उपनगराध्यक्ष महेश कोरी व मंडळाचे अध्यक्ष दयानंद पाटील यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेवून सोहमच्या शिवभक्तीचे कौतुक केले.

रिक्षाचालकाचा मुलगा

सोहमचे वडील सूरज गवळी हे रिक्षाचालक आहेत. शिवज्योत आणण्यासाठी तेही रिक्षा घेवून सोबत गेले होते. शिवज्योतीच्या पाठीमागे कांही अंतरावर त्यांची रिक्षा  होती. अचानक गोंधळ उडाल्यामुळे धावत पुढे गेल्यानंतर सोहमच्या कुर्त्याने पेट घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. मुलगा जखमी झाला, तरीही भगवा खाली पडू न दिल्याबद्दल त्यांनी आनंदाने अभिमान व्यक्त केला. 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजShivjayantiशिवजयंतीkolhapurकोल्हापूर