शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आलं मनात, होर्डिंग लावलं; आता होणार बंद, ग्रामविकास विभागाच्यावतीने धोरण ठरविण्यासाठी समितीची स्थापना

By समीर देशपांडे | Updated: May 22, 2025 18:15 IST

समीर देशपांडे कोल्हापूर : मनात आलं म्हणून गावात होर्डिंग उभारण्यावर आता लवकरच मर्यादा येणार आहेत. कारण यासाठी ग्रामविकास विभागाच्यावतीने ...

समीर देशपांडेकोल्हापूर : मनात आलं म्हणून गावात होर्डिंग उभारण्यावर आता लवकरच मर्यादा येणार आहेत. कारण यासाठी ग्रामविकास विभागाच्यावतीने धोरण ठरविण्यात येत असून, त्यासाठी एका समितीचीही स्थापना करण्यात आली आहे. ६ जून २०२५ पर्यंत या समितीला अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातही भर पडणार आहे.गेल्या १५ वर्षांमध्ये हाेर्डिंग, जाहिरात फलक लावण्याचे प्रमाण वाढले आहे. आता असे कुठलेही गाव शिल्लक राहिले नाही की ज्या ठिकाणी आता अभिनंदन, श्रद्धांजलीचे फलक लागत नाहीत. शिष्यवृत्ती ते यूपीएससीतील धवल यश, श्रद्धांजली, विविध सहकारी, शैक्षणिक संस्था, उद्योग, व्यवसाय यांनीही प्रसिद्धीसाठी अशा फलकांचा आधार घेत आहे.महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या बाबतीत याबाबत काही ना काही धोरण आहे. परंतु ग्रामपंचायत हद्दीतील जाहिरात फलक, होर्डिंग यासाठी स्थानिक ग्रामपंचायत आकारेल तेवढे पैसे असेच धोरण होते. राज्यातील गावांमध्ये याबाबत सुसूत्रता नव्हती.

अशी आहे समिती

  • संचालक, पंचायत राज, महाराष्ट्र राज्य -अध्यक्ष
  • सहसचिव पंचायत राज ग्रामविकास विभाग व पंचायती राज विभाग, मंत्रालय - सदस्य
  • उपायुक्त पुणे विभाग -सदस्य
  • अधीक्षक अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना पुणे -सदस्य
  • कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद पुणे -सदस्य
  • विशाल तनपुरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद -सदस्य
  • राहुल काळभोर प्राचार्य ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र मांजरी पुणे -सदस्य

समिती हे करणारयासाठी अन्य राज्यात असलेले धोरण, ग्रामपंचायतीला मिळणारा महसूल आणि त्याचे विनियमन, परवानगी देण्याची कार्यपद्धती, दुर्घटना झाल्यास त्याची जबाबदारी, या फलकांच्या माध्यमातून शासनाच्या जाहिराती प्रसिद्ध करण्याबाबतचे निकष याचा अभ्यास ही समिती करून अहवाल देणार आहे. सध्या राज्यातील ग्रामपंचायती स्थानिक ठराव करून त्यानुसार आकारणी करीत आहेत. यामध्ये आता सुसूत्रता आणण्याचे धोरण ठरविण्याची जबाबदारी या समितीवर आली आहे.

शासनाने समिती नेमण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. यामध्ये ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळावे यादृष्टीने नियमावली असावी. राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचे एकच धोरण यामुळे ठरणार आहे. - दादासो मोरे सरपंच, इंगळी

टॅग्स :kolhapurकोल्हापूर