शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: चंदगड बंधाऱ्यावर पाणी, गोव्याकडे जाणारा मार्ग तिसऱ्यांदा बंद; १० बंधारे पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 13:19 IST

हा पाऊस भात रोप लागणीसाठी उपयुक्त असून, ९० टक्के काम पूर्ण झाल्याने शेतकरी सुखावला

चंदगड : गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून, ताम्रपर्णी नदीवरील ४ तर घटप्रभा नदीवरील ६ असे एकूण १० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. चंदगड बंधाऱ्यावर पाणी आल्याने तिसऱ्यांदा गोव्याकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.जुलै महिन्यात शेवटच्या आठवड्यात पावसाचा जोर वाढला असून, ताम्रपर्णी नदीवरील कोकरे, चंदगड, हल्लारवाडी, कुर्तनवाडी हे तर घटप्रभा नदीवरील पिळणी, हिंडगाव, कानडी-सावर्डे, कानडेवाडी, बिजूर-भोगोली, तारेवाडी असे एकूण १० बंधारे यंदा तिसऱ्यांदा पाण्याखाली गेले आहेत. हा पाऊस भात रोप लागणीसाठी उपयुक्त असून, ९० टक्के काम पूर्ण झाल्याने शेतकरी सुखावला आहे.घटप्रभा, जंगमहट्टी व जांबरे हे मध्यम प्रकल्प जुलैच्या सुरुवातीलाच भरले आहेत. इतर १८ लघू पाटबंधारे प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरले असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा १५ दिवस अगोदरच पाणीसाठा पूर्ण झाला आहे. सध्या घटप्रभा धरणातून ६०५४ क्युसेक, विद्युतगृहातून ८०० क्युसेक, जंगमहट्टीतून ९९ क्युसेक तर जांबरेतून १०१९ क्युसेक व विद्युतगृह विसर्ग २४० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

चंदगड बंधाऱ्याची उंची वाढविण्याची गरजचंदगडहून गोव्याला जाणाऱ्या मार्गावर चंदगड बंधाऱ्यावर तिसऱ्यांदा पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. गोव्याला जाण्यासाठी हा जवळचा महत्त्वाचा मार्ग असल्याने या बंधाऱ्याची उंची वाढवावी, अशी मागणी होत आहे.