शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर: फराळे कारखान्याचा हंगाम बंद झाल्याने तीनशे तरुण बेरोजगार, शेतकऱ्यांनाही बसणार फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 12:15 IST

रायगडचे शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी दहा वर्षापूर्वी फराळ्याच्या फोंड्या माळावर रिलायब शुगर साखर कारखान्याची स्थापना केली आणी तालुक्याला हरित क्रांतीला चालना मिळाली.

सुनिल चौगलेआमजाई व्हरवडे : राधानगरी तालुक्यातील फराळे येथील रिलायबल शुगर कारखान्याचा यंदाचा हंगाम बंद झाल्याने तीनशे तरुणांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. तसेच तालुक्यातील जवळपास दीड लाख टन ऊस इतर कारखान्यात पाठवताना शेतकऱ्यांची दमछाक होणार असून वाहनधारकांनाही याचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे कामगार, शेतकरी व वाहनधारक हतबल झाले आहेत.राधानगरी मतदारसंघातील लोकप्रतिनिधीच्या अनास्थामुळे तालुक्यात साखर कारखानाच काय तर कोणताही औद्योगिक प्रकल्प उभारला गेला नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी पहायला मिळत आहे. त्यामुळे रोजगारासाठी तरुणाचे जथ्थेच्या जथ्थे कागल व शिरोली एमआयडिसीकडे जातात. रायगडचे शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी दहा वर्षापूर्वी फराळ्याच्या फोंड्या माळावर रिलायब शुगर साखर कारखान्याची स्थापना केली आणी तालुक्याला हरित क्रांतीला चालना मिळाली.प्रतिदिन दोन ते अडीच हजार क्रशिंग कपँशिटी असणारा कारखाना प्रत्येक हंगामात दीड दोन लाख गाळप करत होता. आतापर्यंत आठ गळीत हंगाम पुर्ण झाले. यावर्षीचा हंगाम सुरु होण्याची तयारी सुरु असतानाच कारखाना प्रशासनाने अचानक हंगामच बंद केल्याने तीनशे कामगांराच्या नोकरीवरच गंडातर येण्याची भिती आहे. तर तालुक्यातील दीड लाख टन ऊस इतर कारखान्याना परत पाठवताना शेतकऱ्यांची दमछाक होणार आहे. तसेच अनेक वाहन धारकानाही याचा मोठा फटका बसणार आहे.प्रशासनाने त्वरित लक्ष द्याव३०० कामगार तसेच शेतकरी व वाहनधारकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने याची दखल घेऊन प्रशासनाने कारखाना सुरु होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच लोकप्रतिनिधींनी या विषयात लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

आर्थिक अडचण आल्याने हंगाम वेळेत सुरु झालेला नाही हंगाम सुरु करण्याचा प्रयत्न सुरु आहे - तुषार राणे - कार्यकारी संचालक, साखर कारखाना

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने