शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग रचनेचे अधिकार अधिसूचनेद्वारे दिले, राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांचा युक्तिवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 17:20 IST

आजही सुनावणी

कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रभाग रचना करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचना काढून राज्य शासनाला अधिकार दिल्याचा युक्तिवाद आयोगाचे वकील ॲड. अतुल दामले यांनी बुधवारी उच्च न्यायालयाच्या येथील सर्किट बेंचसमोर केला. अर्ध्या तासात ही सुनावणी झाली. याबाबत पुन्हा आज, गुरुवारी दुपारी चार वाजता सुनावणी ठेवण्यात आली आहे.सलग तिसऱ्या दिवशी सर्किट बेंचमध्ये प्रभाग रचनेबद्दल सुनावणी झाली. पहिले दोन दिवस ॲड. श्रीकृष्ण गनबावले, ॲड. ऋतुराज पवार यांनी प्रभाग रचनेचा अधिकारच शासनाला नसल्याचा मुद्दा मांडला होता. शासनाकडून राबविण्यात आलेल्या प्रक्रियेमध्ये राजकीय दबाव येऊ शकतो असा दावाही त्यांनी यादरम्यान केला होता. यावर मंगळवारी झालेल्या सुनावणीत सरकारी वकील ॲड. अनिल साखरे यांनी कायदेशीर पद्धतीनुसारच राज्य शासनाला ही प्रक्रिया राबविण्याचे अधिकार निवडणूक आयोगाने दिल्याचा युक्तिवाद केला होता.हाच मुद्दा बुधवारी राज्य निवडणूक आयोगाचे वकील ॲड. अतुल दामले यांनी मांडला. ऑनलाइन पद्धतीने हा युक्तिवाद करताना त्यांनी कशाच्या आधारे हे अधिकार शासनाला दिले असे न्यायमूर्तीनी विचारल्यानंतर दि. १८ जून २०२५ च्या अधिसूचनेद्वारे सर्व अधिकार शासनाला दिल्याचे सांगितले. ही सर्व प्रक्रिया झाली आहे. त्यामध्ये या अधिकार देण्याच्या प्रक्रियेला तुमचे ‘ॲप्रुव्हल’ आहे का अशी विचारणा करण्यात आली. यावरही ॲड. दामले यांनी या अधिसूचनेनुसारच ही प्रक्रिया राबविण्याचे अधिकार राज्य शासनाला दिल्याचा पुनरुच्चार केला.