शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात मुश्रीफ-मंडलिक-महाडिकांची गट्टी; सतेज पाटील, पी.एन. शेट्टी, ठाकरे गटाची कसोटी

By समीर देशपांडे | Updated: July 3, 2023 13:28 IST

जिल्ह्याचे राजकारणच बदलणार

समीर देशपांडेकोल्हापूर : जिल्ह्यातील मातब्बर नेते हसन मुश्रीफ यांनीच शिवसेना भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे जिल्ह्याचे राजकारणच बदलणार आहे. यापुढच्या काळात मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खा. धनंजय महाडिक, खा. संजय मंडलिक, खा. धैर्यशील माने, आ. विनय कोरे, आ. प्रकाश आवाडे यांची यापुढच्या राजकारणामध्ये गट्टी दिसणार आहे. आ. पी. एन. पाटील, आ. सतेज पाटील, माजी खा. राजू शेट्टी आणि ठाकरे गटाला इतर छोट्या-मोठ्या गटांना एकत्रित करून त्यांच्याविरोधात मोट बांधावी लागणार आहे.जिल्ह्याच्या राजकारणात गेली काही वर्षे हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील या दोघांच्या नेतृत्वाखाली अनेक निवडणुकांमध्ये यश मिळाले. अगदी ‘गोकुळ’ मध्येही त्यांनी सत्तांतर घडवून आणले. कोल्हापूर महापालिकेतील सत्ता मिळवण्यापासून ते जिल्हा परिषदेत चार वर्षांपूर्वी सत्तांतर करण्यापर्यंत सर्वत्र हे दोघेच प्रामुख्याने जोडण्या घालत होते. परंतु त्यातील मुश्रीफ आता युतीसोबत गेल्याने साहजिकच सतेज पाटील एकाकी पडल्याचे चित्र आहे.सध्या सतेज पाटील यांच्यासोबत पी. एन. पाटील,जयश्री जाधव, ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे, जयंत आसगावकर ही सर्व मंडळींच्या बरोबरच ठाकरे गटही तडफेने सोबत आहे. पुढच्या काळात पाटील बेरजेचे राजकारण करत माजी खा. राजू शेट्टी यांनाही सोबत घेऊ शकतात. त्यामुळे सतेज यांनाच पुढाकार घेऊन पुन्हा एकदा जिल्ह्यात समर्थ विरोधकाची भूमिका पार पाडावी लागणार आहे. शेट्टी यांचा मुख्यत : राष्ट्रवादी काँग्रेस व त्यातही मुश्रीफ यांच्याशीच संघर्ष होता.अजित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये यापुढच्या काळात शिवसेना, भाजपसोबत सर्व निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांपासून अन्य निवडणुकांमध्येही आता हे सर्वजण एकत्र दिसणार आहेत. कागल, आजरा, गडहिंग्लज या तीन तालुक्यांत मुश्रीफ यांचे प्राबल्य आहे. चंदगडचे आ. राजेश पाटील हेदेखील मुश्रीफ यांच्यासमवेत गेले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात महाडिक गटाची ताकद आहे. पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगले, शिरोळ तालुक्यात अनुक्रमे कोरे, आवाडे यांची ताकद आहे. त्यामुळे ही राज्यातील सत्तारूढ आघाडी आणखी मजबूत झाल्याचे मानले जाते.

सर्व जबाबदारी सतेज यांच्यावरया सगळ्यांना टक्कर देण्यासाठी सर्व विरोधकांना एकत्र करण्याची जबाबदारी आमदार सतेज पाटील यांच्यावर आहे. त्यांचाही प्रत्येक तालुक्यात गटही आहे. त्यामुळे कॉंग्रेस, शरद पवार यांच्यासोबत राहणारे नेते, ठाकरे गट आणि स्वाभिमानीचे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, शेकाप अशा सर्वांना एकत्र करून लढाईचे नेतृत्व सतेज पाटील यांना करावे लागणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षHasan Mushrifहसन मुश्रीफDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक