शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांविरोधात निदर्शनाचा इशारा देणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात 

By उद्धव गोडसे | Updated: March 6, 2025 11:40 IST

कोरटकर धमकी प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात निदर्शने होऊ नयेत यासाठी खबरदारी

कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान निदर्शने करण्याचा इशारा दिलेल्या इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी आज सकाळपासून धरपकड सुरू केली. कार्यकर्त्यांनी निदर्शने करू नयेत अशा नोटिसा पोलिसांनी बुधवारी रात्री कार्यकर्त्यांना मोबाईलवर पाठवल्या आहेत. दहा ते बारा कार्यकर्त्यांना पोलीस मुख्यालयात नजर कैदेत ठेवण्यात आले आहे. तरीही इंडिया आघाडी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात निदर्शने करण्यावर ठाम आहे.इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणारा प्रशांत कोरटकर याला पोलिसांनी वेळेत अटक केली नाही. या गुन्ह्याचा तपास संथ गतीने सुरू आहे. कोरटकर हा भाजपमधील काही नेत्यांच्या जवळचा असल्याने त्याच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप इंडिया आघाडीने केला आहे. या निषेधार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यादरम्यान निदर्शने करण्याचा इशारा इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिला होता. निदर्शने करू नयेत अशा सूचना पोलिसांनी कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. तरीही कार्यकर्ते निदर्शने करण्यावर ठाम होते. त्यामुळे पोलिसांनी बुधवारी रात्री काही कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवल्या. तसेच गुरुवारी सकाळीच त्यांना ताब्यात घेतले. हर्षल सुर्वे, वसंतराव मुळीक, प्रवीण पाटील, शुभम शिरहट्टी, आदींचा यात समावेश आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिसChief Ministerमुख्यमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस