शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहत येथील प्रार्थनास्थळ मुस्लिम समाजाने स्वत:हून उतरविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2023 12:32 IST

अनधिकृत मदरशावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या

कोल्हापूर : कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीच्या गुंजोटे कॉलनी परिसरातील अनधिकृत प्रार्थनास्थळ मुस्लिम समाजाने शुक्रवारी स्वत:हून काढून घेत सामंजस्याचा धडा घालून दिला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाला सहकार्य करत कारवाई करण्यापूर्वीच समजुतीची भूमिका घेत मुस्लिम समाजाने या मदरशामधील साहित्य आणि पत्र्याचे शेड स्वत:हून काढून घेतले.लक्षतीर्थ वसाहतीमधील या अनधिकृत मदरशावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या संघटनांनी येथील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत मदरशाचा, तसेच अलिफा अंजुमन मदरशाविरोधात तक्रार दिली होती.महापालिकेच्या नगररचना विभागाने पोलिस फौजफाट्यासह पाहणी करून केवळ कुलूप लावून परत आल्याने हिंदुत्ववादी संघटना संतप्त झाल्या होत्या. त्यांनी महापालिकेत आंदोलन करत हे प्रार्थनास्थळ हटविण्यासाठी सोमवारपर्यंतची मुदत देत घेराव घालण्याचा इशारा दिला. त्यानंतर गुरुवारी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिस बंदोबस्त होता, तसेच गस्तीपथक नेमले होते. अलिफा अंजुमन मदरसा आणि सुन्नत जमात न्याय संस्थेने त्यांचे मदरसे यापूर्वीच बंद केले असल्याचे लेखी दिले आहे. दरम्यान, लक्षतीर्थ वसाहतीतील मुस्लिम समाजाने शुक्रवारी बैठक घेत हे प्रार्थनास्थळाचे बांधकाम स्वत:हून उतरवण्याचा सामंजस्याने निर्णय घेतला. सायंकाळी मुस्लिम समाजाने या प्रार्थनास्थळावरील पत्र्याचे शेड आणि इतर साहित्य काढून घेतले. दरम्यान, ही जागा आपल्या मालकीची असून, ती धार्मिक कामासाठी वापरली जात होती. मात्र, समाजात तेढ निर्माण होऊ नये, म्हणून तसेच महापालिका प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत समाजाने बांधकाम व इतर साहित्य स्वखुशीने काढून घेतल्याचे जागामालक लिलीभाई ऊर्फ हाजी लियाकत गोलंदाज यांनी सांगितले. सर्वांनी एकमेकांना सहकार्य करावे, असे आवाहनही गोलंदाज यांनी केले. मुस्लिम समाजाच्या तरुणाने स्वत:हून हे बांधकाम काढून घेतल्याने पुढील वाद आणि महापालिकेची कारवाई टळली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuslimमुस्लीम