शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात होणार पी ढबाकचा गजर, उद्यापासून त्र्यंबोली देवीच्या यात्रेला प्रारंभ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 16:58 IST

यात्रेसाठी मिळणार चार मंगळवार, चार शुक्रवार

कोल्हापूर : पंचगंगा नदीला आलेले नवे पाणी आषाढात कोल्हापूरची रक्षकदेवता असलेल्या त्र्यंबोली देवीला वाहण्याची प्रथा आहे. या प्रथेनुसार शुक्रवारपासून त्र्यंबोली देवीच्या यात्रेला प्रारंभ हाेत आहे. यंदा आषाढातील चार शुक्रवार आणि चार मंगळवार यात्रेसाठी मिळणार आहे. मात्र आषाढी एकादशीनंतरच यात्रेचा खऱ्या अर्थाने सुरुवात होईल.रणरणत्या उन्हाळ्यानंतर पावसाची सुरुवात होते. पंचगंगा नदीला नवे पाणी येते हे पाणी वाजतगाजत त्र्यंबोली देवीच्या चरणावर वाहिले जाते. कुमारिका, सुवासिनी महिला हे पाणी सजवलेल्या कळशीतून डोक्यावरून घेऊन जातात. मिरवणुकीत पारंपरिक वाद्य असलेला पी ढबाकचा गजर होतो. बुधवारी अमावस्या झाल्याने कोल्हापुरकरांना आता त्र्यंबोली यात्रेचे वेध लागले आहेत.यंदा यात्रेसाठी चार मंगळवार आणि चार शुक्रवार मिळत आहेत. मात्र आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमा होईपर्यंत यात्रांचे प्रमाण कमी असते. यंदा ६ ऑगस्टला आषाढी एकादशी आहे. त्यानंतर येणाऱ्या मंगळवारी भौम प्रदोष आहे. त्यामुळे या दिवशी यात्रेची शक्यता कमी आहे. गुरुवारी (दि. १०) गुरुपौर्णिमा आहे. त्यानंतर ११, १५ १८ व २२ जुलै या चार दिवसांतच मोठ्या प्रमाणात त्र्यंबोली यात्रा होतील.

  • शुक्रवार : २७ जून, ४, ११, १८ जुलै
  • मंगळवार : १, ८, १५, २२ जुलै.
  • आषाढी एकादशी : ६ ऑगस्ट
  • गुरुपौर्णिमा : १० ऑगस्ट