शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शिक्षक म्हणतात पुरे झाले 'नाथा', दलालांना आवरा; माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात पैशाशिवाय होत नाही काम

By पोपट केशव पवार | Updated: December 11, 2023 13:47 IST

विशेष म्हणजे या विभागातील मलिदा पाहून पंटर चाळकेने दुसरीकडील सरकारी नोकरीचा राजीनामा दिला असल्याचे समजते.

पोपट पवारकोल्हापूर : एका टेबलावर ठेवलेली फाइल पुढच्या टेबलावर देण्यापासून ते हक्काची वेतनश्रेणी, पदोन्नती, फरक बिल मिळविण्यापर्यंत बारीकसारीक कामांनाही माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात पैसे द्यावे लागत असल्याचे चित्र आहे. या कामांसाठी नेमलेली दलालांची साखळी या कार्यालयापर्यंत पोहोचूच देत नाही. यातूनही कोणी पोहोचलाच तर कार्यालयातील कर्मचारीच दलालांचा 'मार्ग' दाखवित असल्याने जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक पुरते वैतागले आहेत.कष्टातून शिकायचे, नोकरीसाठी संस्थाचालकांचे उंबरे झिजवायचे अन् त्यानंतरही पुन्हा हे कार्यालय हक्काच्या वेतनावर डल्ला मारत असल्याने 'पुरे झाले नाथा, दलालांना आवरा आता' अशी म्हणण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे.स्वच्छ प्रतिमेचा डंका पिटणारे 'नाथ' या दलालांना व कार्यालयातील लिपिकांना का आळा घालत नाहीत, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.धामोड (ता. राधानगरी) येथील एका शिक्षकाला कायमस्वरुपी करताना या कार्यालयाने भलताच त्रास दिला आहे. त्याचा मागील फरक १२ लाख रुपये देण्यात आला. पण, त्यासाठी त्याच्याकडे २० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. ‘तुला पर्मनंट केले आहे, मग एवढी रक्कम देण्यास काय अडचण आहे? असे बौद्धिकही त्याला दिले. तो याला तयार झाला नसल्याने त्याच्या मूळ ऑर्डरमध्ये त्रुटी काढून त्याचे वेतन थांबवले आहे.अशा स्वरूपाच्या तक्रारी अनेक शिक्षकांच्या आहेत. ‘लोकमत’ने वृत्तमालिका सुरू केल्यानंतर तिथे कसे लुबाडणूक होते याचे अनेक किस्से शिक्षकांनी स्वत:हून सांगितले. तुमचे काम झाल्यावर तुम्हाला दरमहा एवढी रक्कम मिळणार आहे मग त्यातील अमुक एवढी रक्कम आम्हाला दिली तर काय बिघडते, असे या लुटीचे स्वरूप असल्याचे शिक्षकांनी सांगितले. 

घुणकीचा चाळकेच चालवतो विभागघुणकी (ता. हातकणंगले) येथील चाळके नावाचा व्यक्ती 'नाथा'चा पंटर आहे. हातकणंगले, शिरोळ, वारणा परिसरातील सर्व फाइल्स तोच त्याच्या घरातून परिपूर्ण करून घेतो. त्याच्याकडे या विभागाचे शिक्केही तयार आहेत. सर्व व्यवहार पूर्ण झाला की केवळ सहीसाठी ही फाइल कार्यालयात जात असते. त्यामुळे या कार्यालयाचे उपकार्यालयच त्याने घुणकीत बनवले असल्याची चर्चा जिल्हाभरातील शिक्षकांमध्ये आहे. विशेष म्हणजे या विभागातील मलिदा पाहून या चाळकेने दुसरीकडील सरकारी नोकरीचा राजीनामा दिला असल्याचे समजते.

शिक्षकांवर दबावएखाद्या कामासाठी पैसे देण्यास संबंधित शिक्षकाने मनाई केली तर त्या शिक्षकावर कार्यालयातील लिपिकापासून दलालांपर्यंत सगळेच जण दबाव आणतात. अशावेळी संस्थाचालकही त्या शिक्षकाच्या पाठीवरील हात काढून घेतो. त्यामुळे 'पैसे दिले तरच काम होईल' ही पद्धत या साखळीने अधिक मजबूत केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBribe Caseलाच प्रकरणTeacherशिक्षक