शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

कोल्हापूर, हातकणंगलेत पाटलांचा जोर; कांबळे, जाधव, नाईक, सुतार आडनावाचे मतदार किती..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 12:59 IST

पाटील याच्यानंतर कांबळे आडनाव असलेल्या मतदारांची संख्या जास्त

असिफ कुरणेकोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात पाटील आडनाव असणाऱ्या मतदारांची संख्या ही इतर आडनावांच्या मतदारांपेक्षा जास्त आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात ३ लाख ३९ हजार तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात २ लाख ६३ हजार ५६३ पाटील आडनावाचे मतदार आहेत. त्यानंतर कांबळे आडनावाचे मतदार असून, त्यांची संख्या कोल्हापूर मतदारसंघात १ लाख, तर हातकणंगले मतदारसंघात ८२ हजार ४२१ एवढी आहे. त्यानंतर जाधव आडनावाचे मतदार जास्त आहेत. मतांची ही आकडेवारी पाहता दोन्ही मतदारसंघात पाटलांचीच ताकद जास्त दिसते.

निवडणुकीच्या मतदार याद्यांचे विश्लेषण केल्यानंतर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात पाटील आडनाव असलेल्या मतदारांचा बोलबाला असल्याचे चित्र आहे. शिरोळ, हातकणंगले, इस्लामपूर वाळवा या मतदारसंघात पाटील आडनावात मराठा व जैन समाजाच्या मतदारांचा समावेश दिसतो. इतर मतदारसंघात मात्र मराठा पाटील यांची संख्या जास्त आहे.कोल्हापूर लोकसभेत राधानगरी भुदरगड व करवीर विधानसभा मतदारसंघात पाटील आडनावाचे मतदार जास्त आहेत. राधानगरी, भुदरगडमध्ये तब्बल ९० ४५२ एवढे म्हणजे २४ टक्के तर करवीरमध्ये ८३ हजार ५८३ (२७.५ टक्के) पाटील मतदार आहेत. या मतदारसंघात निकाल प्रभावित करण्याची ताकद पाटील नावाच्या मतदारांमध्ये आहे. तर, हातकणंगले लोकसभेत शिराळा मतदारसंघात ७०,४४० (२४ टक्के) तर शाहूवाडी मतदारसंघात ६७,९६० (२३ टक्के) पाटील मतदार आहेत.

पाटील याच्यानंतर कांबळे आडनाव असलेल्या मतदारांची संख्या जास्त आहे. राधानगरी मतदारसंघात २७,८८९ तर करवीरमध्ये २५ हजार कांबळे आडनावाचे मतदार आहेत. त्यानंतर जाधव आडनावाचे मतदार आहे. जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात जाधव, नाईक, सुतार, कुंभार या आडनावांची संख्यादेखील हजारात आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघआडनाव -  एकूण मतदारचंदगड विधानसभापाटील -   ५३,६४२कांबळे -  २०,९७५नाईक -  ११,३४७

राधानगरी भुदरगड विधानसभापाटील  -  ९०,४५२कांबळे - २७,८८९सुतार -  ९७९८

कागल विधानसभापाटील  -  ५५,८४४कांबळे -  २१,७५७जाधव -  ८३४०

कोल्हापूर दक्षिणपाटील  -  ३६,६८०कांबळे -  १२,७७२जाधव  -  ८,१८७

कोल्हापूर उत्तरपाटील  - १८,८१३जाधव  -  ८,६८३कांबळे -   ७,८१४

करवीर विधानसभापाटील -  ८३,५८३कांबळे - २४,९२३जाधव  -  ७,९०२

हातकणंगले लोकसभा मतदारसंघशाहूवाडी विधानसभापाटील -  ६७,९६०कांबळे  -  १४,३५३जाधव   -   ९०८०

हातकणंगले विधानसभापाटील -   ४०,४३८कांबळे -  २००५७जाधव -  ८७३४

इचलकरंजी विधानसभापाटील  -   १५,४१७कांबळे - १०,९७०जाधव   -  ५,३३६

शिरोळ विधानसभापाटील  -  २९९३४कांबळे  -  २०,४८१जाधव -  ४०९६

इस्लामपूर वाळवा विधानसभापाटील  -  ३९,३७४कांबळे  -  ८,२०३जाधव  -  ९,८४३

शिराळा विधानसभापाटील   -  ७०४४०कांबळे -  ८३५७जाधव  -  १२,२३७

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरhatkanangle-pcहातकणंगलेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४