शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
2
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
3
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
4
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
5
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
6
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
7
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
8
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
9
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
10
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
11
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
12
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
13
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
14
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
15
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
16
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
17
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
18
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
19
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
20
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!

Kolhapur: विदर्भ, मराठवाड्यातील पुरामुळे अंबाबाईची भाविक संख्या घटली, गतवर्षीपेक्षा ५ लाखांनी कमी झाली संख्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 18:36 IST

दिवस वाढले तरी भाविक घटले

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात सातत्याने पडणारा पाऊस आणि विदर्भ मराठवाडा, सोलापूरसह विविध जिल्ह्यांमध्ये आलेला पूर, नागरिकांचे झालेले मोठे नुकसान आणि पुरामुळे बंद झालेले रस्ते या अस्मानी संकटामुळे अंबाबाई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दरवर्षीच्या तुलनेत घटली. घटस्थापनेपासून गेल्या नऊ दिवसांत १५ लाख ९४ हजार ४९० भाविकांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. गतवर्षीपेक्षा तब्बल ५ लाखांनी ही संख्या घटली आहे.देशातील ५१ शक्तिपीठ व महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांतील देवता असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवात दरवर्षी लाखो भाविक कोल्हापुरात दाखल होतात. यंदा तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याने ही गर्दी वाढण्याची अपेक्षा होती.

वाचा : रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या, अपूर्व उत्साह अन् अखंड जयघोषात अंबामातेची नगरप्रदक्षिणा-videoपण, नाशिक, धाराशिव, जळगाव, बीड, नांदेड, सोलापूर अशा विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने कधी नव्हे ते दुष्काळी भागात पूर आला. घरांसह शेतीचे नुकसान झाले. अनपेक्षित आलेल्या या अस्मानी संकटामुळे या भागातून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली. मुंंबई, पुण्यातील भाविकदेखील कमी होते. शुक्रवार आणि शनिवार या दोन महत्त्वाच्या दिवशी धो-धो पाऊस पडल्याचाही परिणाम झाला.

वाचा : खंडे नवमीला कोल्हापुरातील अंबाबाईची भैरवी माता रूपात पूजादिवस वाढले तरी भाविक घटलेदेवस्थानकडील नोंदीनुसार, गेल्या पाच-सहा वर्षांत कोरोना काळातील २ वर्षे सोडली तर दरवर्षी नवरात्रौत्सवात अंबाबाई दर्शनासाठी २० ते २२ लाख भाविक येतात. पण, यंदा ही संख्या १६ लाखांवर थांबली आहे. सरासरी ४ ते ५ लाख भाविक यंदा आलेले नाहीत. यंदा तर नवरात्रोत्सव व दसरा मिळून ११ दिवस हा सण साजरा होत आहे. दिवस वाढल्याने भाविक वाढण्याऐवजी कमी झाले. खंडेनवमी व दसऱ्याला लाखात नोंद व्हावी एवढी गर्दी नसते.

दिवस व भाविक संख्या अशी२२ सप्टेंबर : १ लाख १८ हजार ४१७२३ सप्टेंबर : १ लाख ७८ हजार २०७२४ सप्टेंबर : १ लाख २५ हजार २०६२५ सप्टेंबर : २ लाख १७ हजार २०८२६ सप्टेंबर : २ लाख २३ हजार १०६२७ सप्टेंबर : १ लाख १६ हजार १०७२८ सप्टेंबर : २ लाख ४५ हजार ७२९२९ सप्टेंबर : १ लाख ७८ हजार २०६३० सप्टेंबर : १ लाख ९२ हजार ३०४एकूण : १५ लाख ९४ हजार ४९०

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Ambabai Temple Sees Fewer Devotees Due to Flood Impact

Web Summary : Floods in Vidarbha and Marathwada caused a significant drop in devotees visiting the Ambabai temple in Kolhapur during Navratri. The number decreased by 5 lakhs compared to last year, totaling 15.94 lakh visitors over nine days.