शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: बाळ असेल कमी वजनी, 'सीपीआर' ठरेल संजीवनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 18:44 IST

निर्जंतुकीकरणासाठी हायटेक यंत्रणा, तापमानाचेही नियंत्रण

समीर देशपांडेकोल्हापूर : कमी वजनाच्या आणि कमी दिवसांच्या बाळांसाठी आता ‘सीपीआर’मधील नवजात अर्भक अतिदक्षता विभाग संजीवनी ठरणार आहे. कोट्यवधी रुपये खर्चून या ठिकाणी निर्जंतुकीकरणासाठी हायटेक यंत्रणा उभारण्यात आली असून, बाळाच्या वॉर्मरमधील तपमानही नियंत्रित करण्याची यंत्रणा या ठिकाणी उभारण्यात आली आहे.याआधीच्या अतिदक्षता विभागात बाळांच्या उच्छ्वासावाटे किंवा स्पर्शावाटे जंतू पसरण्याची प्रक्रिया सुरूच राहत होती. तीच हवा बंद वाॅर्डमध्ये फिरत राही, परंतु आता ही हवा इमारतीवरील ‘एचयु’ युनिटकडे पाठवली जाणार असून तेथून ती शुद्ध होऊन पुन्हा या वॉर्डमध्ये येईल. वरच्या बाजूला ट्रिपल फिल्टर होऊन ही हवा खाली येणार आहे. या विभागात आता २० ऐवजी २५ वॉमर्र बसवण्यात आले असून, सेफ्टिक कम्पार्टमेंट, हाय डिपेन्डन्सी आणि लो डिपेन्डन्सी अशा तीन प्रकारांत या बाळांची विभागणी करण्यात येणार आहे आणि त्याच्या आरोग्यस्थितीनुसार या बाळांना त्या-त्या ठिकाणी ठेवण्यात येईल.प्रत्येक वॉर्मरचे तापमान नियंत्रित करणारे उच्च दर्जाचे सेन्सर बसवण्यात आले असून, अनेकदा कमी वजनाची आणि कमी दिवसांची मुले गार पडण्याची शक्यता असते. बाहेरील तापमान आणि बाळांच्या शरीराचे तापमान संतुलित करणारी यंत्रणा या ठिकाणी स्थापित करण्यात आली असून, त्यातील बदल हा अलार्मच्या माध्यमातून तातडीने सांगितला जाणार आहे.

दुर्घटना झालीच तर..अनेकदा अनेक विद्युत उपकरणे असलेल्या विभागांमध्ये आग लागण्यासारखी दुर्घटना घडू शकते. याचा विचार करून या ठिकाणी दुर्दैवाने असा प्रकार झालाच, तर हा सर्व धूर किंवा आग बाळापर्यंत न पोहोचता ती शोषून बाहेर काढण्याचीही यंत्रणा बसवण्यात आली आहे.

कमी वजनाच्या आणि कमी दिवसांच्या बाळांसाठी आता सीपीआरमध्ये उत्तम अशी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात आली आहे. अगदी पुण्या, मुंबईसारखी ही यंत्रणा येथे उभारण्यात आली आहे. नवजात बालकांसाठी ही संजीवनीच ठरणार आहे. याच विभागाचे लोकार्पण रविवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. - डॉ. संगीता कुंभोजकर, बालरोगतज्ज्ञ