शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Politics: मंडलिक-मुश्रीफ ही नावे वेगळी होऊ शकत नाहीत, हसन मुश्रीफ यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 17:51 IST

पाठिंब्यासाठी संजयबाबांना भेटणार

कागल : या लोकसभा निवडणुकीत पालकमंत्री म्हणून महायुतीने दिलेली जबाबदारी मला पार पाडायची आहे. कोल्हापूर आणि हातकंणगले मतदारसंघांतील दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासोबतच मला राज्यातही ठिकठिकाणी प्रचारासाठी जावे लागणार आहे. संजय मंडलिक हे तर आपल्या तालुक्यातील उमेदवार आहेत. कागलमधून त्यांना मोठे मताधिक्य देऊ या. पुन्हा एकदा खासदार करून तालुक्याचा मानसन्मान जपूया, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. मंडलिक आणि मुश्रीफ ही दोन नावे वेगळी होऊ शकत नाहीत. राजकारणात कितीही मतभेद आले तरी अंतर्मनात आम्ही एकच आहोत, असेही ते म्हणाले.कागलमध्ये कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मंत्री मुश्रीफ बोलत होते. शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक प्रमुख उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, युवराज पाटील, प्रवीणसिंह पाटील, भय्या माने, नविद मुश्रीफ, सतीश पाटील, विष्णुपंत केसरकर, वसंतराव धुरे, राजू खाणगावे, चंद्रकांत गवळी, वसंतराव यमगेकर, काशिनाथ तेली, शशिकांत खोत आदी उपस्थित होते.संजय मंडलिक म्हणाले, कागल तालुक्यात विकासाचे राजकारण करण्यासाठी स्पर्धा असते. माझ्या उमेदवारीसाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह खासदार धनंजय महाडिक व महायुतीच्या सर्वच नेत्यांनी प्रयत्न केले. यावेळी मान्यवरांची भाषणे झाली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन दिंडे यांनी स्वागत तर संजय चितारी यांनी आभार मानले.            

पाठिंब्यासाठी संजयबाबांना भेटणारतालुक्याचा खासदार होत असताना सर्व नेतेमंडळींनी एकत्र येण्याची गरज आहे. विक्रमसिंह घाटगे, सदाशिवराव मंडलिक यांच्यानंतर पालकत्वाची जबाबदारी हसन मुश्रीफ यांच्यावर आहे. आपण, मंत्री मुश्रीफ व समरजित विकासासाठी एकत्र आलो आहोत. माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनाही मी भेटून मदतीसाठी विनंती करणार आहे, असे मंडलिक म्हणाले. तेव्हा मंत्री मुश्रीफ यांनी मीही त्यांना याबद्दल भेटणार असल्याचा दुजोरा दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणHasan Mushrifहसन मुश्रीफsanjay mandlikसंजय मंडलिक