शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

घराला लागलेली आग विझवायला गेल्यानंतर उघडकीस आला वृद्धाचा खून, कोल्हापुरातील पाचगाव रोडवरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 17:30 IST

रिक्षाचालकाचा खून करून हल्लेखोर पसार

कोल्हापूर : येथील हनुमाननगर परिसरातील पाचगाव रोडवर घराला लागलेली आग विझविण्यासाठी गेलेल्या शेजा-यांना घरात रिक्षाचालक वृद्धाचा मृतदेह आढळला. मोहन नारायण पवार (वय ७२, रा. हनुमाननगर, कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. हा प्रकार गुरुवारी (दि. ४) सकाळी साडेअकराच्या सुमारास निदर्शनास आला.हल्लेखोराने चाकूने गळा चिरून पवार यांचा खून केला असावा. तसेच देव्हा-यावरील समईने बेडवरील गादीला आग लावून पळ काढला असावा, असा प्राथमिक अंदाज जुना राजवाडा पोलिसांनी वर्तवला आहे.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मोहन पवार आणि त्यांचा मुलगा पुष्कराज (वय २५) हे दोघेच पाचगाव रोड येथील घरात राहत होते. मोहन हे रिक्षा चालवत होते, तर त्यांचा मुलगा शहरातील एका महाविद्यालयात नोकरी करतो. गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास मुलगा कॉलेजवर गेला. सकाळी साडेअकराच्या सुमारास घरातून धुराचे लोट उसळल्यानंतर शेजा-यांनी पुष्कराज याला फोन करून घरात आग लागल्याची माहिती दिली. तसेच अग्निशामक दलास वर्दी दिली.दरम्यानच्या काळात शेजा-यांनी स्वयंपाक घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता बेडवर मोहन पवार हे अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळले. काही वेळातच दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझवली. माहिती मिळताच जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. ठसेतज्ज्ञ आणि श्वान पथकाने हल्लेखोराचा माग काढण्याचा प्रयत्न केला. फॉरेन्सिकच्या पथकानेही घटनास्थळावरून काही संशयास्पद वस्तू जप्त केल्या. ऐन गणेशोत्सवात घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.