शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

वीज बिल थकल्याचा मेसेज अन् बँक खात्यातील पावणेबारा लाख लंपास; कोल्हापुरातील वृद्धाला ऑनलाइन गंडा

By उद्धव गोडसे | Updated: October 21, 2023 12:52 IST

कोल्हापूर : 'तुमचे वीज बिल थकले असून, आज रात्रीपासून वीज पुरवठा खंडित होईल,' असा मेसेज पाठवून अज्ञाताने विलास मारुती ...

कोल्हापूर : 'तुमचे वीज बिल थकले असून, आज रात्रीपासून वीज पुरवठा खंडित होईल,' असा मेसेज पाठवून अज्ञाताने विलास मारुती पाटील (वय ७९, रा. रामानंदनगर, कोल्हापूर) यांना ११ लाख ८३ हजार रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार १० ते २० ऑक्टोबर दरम्यान घडला. याबाबत पाटील यांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, संशयिताचा शोध सुरू आहे.पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या मोबाइलवर एक मेसेज आला. 'तुमचे वीज बिल थकले असून, आज रात्री पावणेअकरापासून तुमचा वीज पुरवठा खंडित होईल. बिल भरण्यासाठी महावितरणच्या कार्यालयास संपर्क साधा,' असा तो मेसेज होता. त्यानंतर काही वेळाने दुसरा मेसेज आला. 'वीज बिल भरण्यासाठी पुढील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधा.' वीज पुरवठा बंद होऊ नये यासाठी पाटील यांनी ऑनलाइन बिल भरण्याचा विचार केला. त्यानुसार मेसेजमधील नंबरवर कॉल केल्यानंतर त्यांना व्हॉट्सॲपला एक अर्ज पाठवण्यात आला. माहिती भरून घेताना संशयितांनी त्यांच्या बँक खात्यांचा तपशील मिळवला. त्यानंतर संशयिताने मोबाइलवरून बिलाची रक्कम वर्ग करण्यास सांगितले. त्याचवेळी पाटील यांच्या खात्यातील ११ लाख ८३ हजार रुपयांची रक्कम वजा झाल्याचा मेसेज आला. बँकेत जाऊन खात्यातील रक्कम तपासल्यानंतर त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरonlineऑनलाइनfraudधोकेबाजीcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिस