शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
4
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
5
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
6
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
7
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
8
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
9
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
11
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
12
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
13
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
14
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
15
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
16
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
17
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
18
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
19
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
20
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण

रेंदाळ बँकेच्या व्यवस्थापकाचा दीड कोटींवर डल्ला, झटपट श्रीमंत होण्याचा हव्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 12:59 IST

त्यांने हा सर्व पैसा झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी विविध प्रकारच्या करन्सी, शेअर मार्केट व कर्नाटक सीमाभागातील गावांत जमीन खरेदी करण्यासाठी गुंतविल्याचे समजते.

हुपरी : रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील आबासाहेब पाटील रेंदाळ सहकारी बँकेच्या इचलकरंजी शाखा व्यवस्थापकाने बँकेच्या पैशांवर सुमारे दीड कोटी रुपयांवर डल्ला मारल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. याच व्यवस्थापकाने बँकेबरोबरच अन्य काही खासगी लोकांकडूनही कोट्यवधी रुपये उकळले असल्याची चर्चा सुरू आहे.त्यांने हा सर्व पैसा झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी विविध प्रकारच्या करन्सी, शेअर मार्केट व कर्नाटक सीमाभागातील गावांत जमीन खरेदी करण्यासाठी गुंतविल्याचे समजते. या घटनेमुळे बँकेच्या ठेवीदारांत खळबळ उडाली आहे.या घटनेस बँकेचे अध्यक्ष अरुण महाजन यांनी दुजोरा दिला असून बँकेने संबंधित व्यवस्थापकाकडून आतापर्यंत ६० लाख रुपये घेतले आहेत असून उर्वरित रक्कमेच्या वसुलीसाठी त्या व्यवस्थापकाची संपत्ती कायदेशीर मार्गाने बँक ताब्यात घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.गेल्या वर्षभराच्या कालावधीत या व्यवस्थापकाने आपले नातेवाईक, मित्रमंडळी व सगेसोयरे यांच्या नांवे बोगस सोने तारण व कर्ज प्रकरणे दाखवून बँकेच्या सुमारे दीड कोटी रुपयांवर डल्ला मारल्याचा प्रकार घडल्याचे समोर आला आहे. समाजातील सर्वसामान्य घटक व छोटे-छोटे यंत्रमागधारक व अन्य व्यावसायिकांचा आधारवड असणाऱ्या बँकेची या व्यवस्थापकाने मोठी फसवणूक केली आहे.या बँकेने दोन वर्षापूर्वीच आपला सुवर्णमहोत्सव साजरा केला आहे. बँकेची इचलकरंजी शाखा उत्तम पद्धतीने सुरू असून बँकेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक व सभासदाभिमुख कार्यामुळे या शाखेने अल्पावधीतच नावलौकिक प्राप्त केला. बँकेच्या या नावलौकिकास काळिमा फासण्याचे काम याच शाखेतील व्यवस्थापकाने केले आहे. असाच प्रकार गडहिंग्लजमधील एका नावाजलेल्या बँकेतही गेल्यावर्षी उघडकीस आला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँकfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी