शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

लहानगा प्रसाद सुटाबुटात जिल्हाधिकाऱ्यांच्या शेजारी अन् मंत्री मुश्रीफांच्या बैठकीला बसला, सगळ्यांमध्येच कुतूहलाचा विषय ठरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 17:26 IST

कोल्हापूर : सोमवारी (दि. २०) दुपारी साडेबारा-एकची वेळ.. जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी, निवेदन देण्यासाठी मोठी गर्दी झालेली. त्यांच्या दालनात जाताच अगदी ...

कोल्हापूर : सोमवारी (दि. २०) दुपारी साडेबारा-एकची वेळ.. जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी, निवेदन देण्यासाठी मोठी गर्दी झालेली. त्यांच्या दालनात जाताच अगदी शेजारच्या खुर्चीत सुटाबुटात लहान मुलगा बसला होता. दिवसभराच्या बैठका, अभ्यागत भेटीलाही त्याची खुर्ची जिल्हाधिकाऱ्यांच्या शेजारी, अगदी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बैठकीलासुद्धा. हा मुलगा नेमका कोण याबद्दल सगळ्यांमध्येच कुतूहल. हा आहे लहानगा भावी जिल्हाधिकारी प्रसाद संजय जाधव.शिक्षण विभागाने सुरू केलेल्या ‘डे विथ कलेक्टर’ या अभिनव उपक्रमात दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्ह्यातून निवड झालेला एक हुशार विद्यार्थी जिल्हाधिकाऱ्यांसोबत दिवसभर उपस्थित असणार आहे. सोमवारी पहिल्यांदाच झालेल्या या उपक्रमासाठी नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील श्री पाराशर हायस्कूलमधील प्रसाद संजय जाधव या दहावीतील विद्यार्थ्याची निवड झाली. प्रसादची शारीरिक उंची कमी असली बौद्धिक उंची जबरदस्त आहे. शाळेत पहिला नंबर त्याने कधी सोडला नाही, वक्तृत्व, भाषा, संवाद कौशल्य, अभ्यासातील गुणवत्तेच्या आधारावर त्याची निवड झाली. सोमवारच्या सगळ्या बैठका, चर्चा, निवेदन, अगदी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत झालेल्या बैठकीलाही तो जिल्हाधिकाऱ्यांच्या शेजारी बसला होता. त्याने जेवणही त्यांच्यासोबतच केले. संध्याकाळी आपली निरीक्षणे त्याने एका कागदावर लिहून दिली.

साहेब तुम्ही बसा..काही दिवसांपूर्वीच झालेल्या विज्ञान प्रदर्शनात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते प्रसादला पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. त्यावेळी त्याने मला जिल्हाधिकारी व्हायचे आहे अशी इच्छा बोलून दाखवली. सोमवारी त्याच मुलाला आपल्या दालनात बघून जिल्हाधिकाऱ्यांच्याही चेहऱ्यावर स्मित हास्य आले. काही कारणाने जिल्हाधिकारी उठून उभारले की तोदेखील उभे राहायचा.. त्यावेळी जिल्हाधिकारी प्रसादला म्हणाले, साहेब तुम्ही बसा, तुम्ही उठायची गरज नाही. अशारीतीने तो सर्वांच्याच कौतुकाचा विषय झाला होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी