शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रोत्साहन’च्या अपात्र शेतकऱ्यांची यादी कारणासह येणार, पंधरा दिवसांत तिसरी यादी  

By राजाराम लोंढे | Updated: January 5, 2023 12:22 IST

तिसऱ्या यादीत कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे पाच हजार शेतकऱ्यांचा समावेश

कोल्हापूर : नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचे वाटप एकीकडे सुरू असताना दुसऱ्या बाजूला ज्यांना पैसे आलेले नाहीत, त्यांचा जीव टांगणीला लागला आहे. तिसऱ्या यादीत सुमारे पाच हजार पात्र शेतकऱ्यांचा समावेश असणार आहे. त्याचबरोबर जे अपात्र ठरले आहेत, त्यांची नावे कारणासह जाहीर केली जाणार आहेत.राज्य सरकारने पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला. मुळात या याेजनेची अंमलबजावणी करण्यासाठी अडीच वर्षे गेली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात फेब्रुवारी २०२२ ला दहा हजार कोटीची तरतूद करण्यात आली. त्याची अंमलबजावणी सुरू होते, तोपर्यंत सरकार गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी तातडीने पहिली यादी जाहीर केली. कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख २९ हजार ३१८ पात्र शेतकऱ्यांचा समावेश पहिल्या यादीत होता. त्यातील बहुतांशी जणांच्या खात्यावर पैसेही वर्ग झाले. पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी तयार झाली तोपर्यंत ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याने ती थांबविण्यात आली.निवडणुकीनंतर ५७ हजार ३१० शेतकऱ्यांची दुसरी यादी आली आहे. येत्या पंधरा दिवसात तिसरी यादी येणार असून त्यामध्ये जिल्ह्यातील सुमारे पाच हजार शेतकऱ्यांचा समावेश असेल.जिल्ह्यातून २ लाख २५ हजार शेतकऱ्यांची माहीती पोर्टलद्वारे भरली होती. तिन्ही यादीत त्यातील सुमारे १ लाख ९० हजार शेतकरी पात्र तर उर्वरित सुमारे ३५ हजार शेतकरीही अपात्र ठरू शकतात. तिन्ही यादीत ज्यांची नावे आलेली नाहीत, त्यांची नावे अपात्रतेच्या कारणासह प्रसिद्ध केली जाणार आहेत.राष्ट्रीयीकृत बँकांकडील लाभार्थी कमीविकास संस्थांकडे पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तुलनेत अधिक असली तरी राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्जदार खातेदारही कमी नाहीत. मात्र पहिल्या दोन यादीत १ लाख ८६ हजार पात्र शेतकऱ्यांपैकी केवळ ८ हजार ४०५ शेतकरी हे राष्ट्रीयीकृत बँकांचे आहेत. त्यामुळे या बँकांशी संबधित शेतकऱ्यांची घालमेल वाढली आहे.अपात्र ठरले तरी दाद मागता येणारतिन्ही यादीत ज्यांची नावे आलेली नाहीत, त्या अपात्र शेतकऱ्यांना शासनाकडे दाद मागता येणार आहे. संबंधितांच्या अर्जावर शहानिशा होऊन त्यावर याेग्य ती कार्यवाही केली जाणार आहे.

दृष्टिक्षेपात ‘प्रोत्साहन’ अनुदान योजना सहभागी शेतकरी - २ लाख २५ हजारपहिली यादीतील पात्र - १ लाख २९ हजार ३१८दुसऱ्या यादीतील पात्र - ५७ हजार ३१०

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी