शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

एकरकमी एफआरपीचा कायदा पूर्ववत करणार, मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 11:53 IST

राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक

कोल्हापूर : येत्या आठवड्यात ऊस दर नियंत्रण समितीची स्थापना करू, दोन टप्प्यांतील एफआरपीचा कायदा मागे घेऊन एकरकमी एफआरपी मिळण्याचा कायदा पूर्ववत करू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी प्रलंबित मागण्यांसंबंधीचा निर्णय तातडीने घ्या, अशी आग्रही मागणी केली.कोल्हापुरातील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांना शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी जाब विचारू, असा इशारा शेट्टी यांनी दिला होता. याची दखल घेऊन ही बैठक घेण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती.बैठकीत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळाली पाहिजे, यावर आम्ही ठाम आहोत. त्यासाठी कोणतीही तडजोड करणार नाही. येत्या आठवड्यात यावर तातडीने निर्णय घेऊन दोन टप्प्यांतील एफआरपीचा कायदा मागे घेऊ. नियमित कर्ज भरणाऱ्या ज्या शेतकऱ्यांनी केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम तातडीने देण्यात येईल. राज्यातील अनेक ऊस वाहतूकदारांची ऊस तोडणी मुकादमांकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. संबंधित मुकादमांवर गुन्हे दाखल केले आहेत. यासाठी एकच नोडल अधिकारी नेमून तातडीने कारवाई केली जाईल.

....तर ‘शासन आपल्या दारी’ उधळून लावूद्राक्ष आणि बेदाणा उत्पादक आर्थिक संकटात आहेत. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढले आहे, त्या शेतकऱ्यांचे व्याज माफ करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. राज्य शासनाने यावर कोणतीही अंमलबजावणी केली नाही, तर ‘शासन आपल्या दारी’ हे सर्व कार्यक्रम आम्ही उधळून लावू, असा इशारा यावेळी शेट्टी यांनी दिला.

चूक दुरुस्त करूजिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पीक कर्ज घेऊन नियमित भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ प्राधान्याने मिळालेला आहे. मात्र, राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज उचलणाऱ्या शेतकऱ्यांना संपूर्ण वर्षभराची मुदत असल्याने शासनाच्या नियमांत ते शेतकरी बसत नसल्याचे शेट्टी यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर ती चूक दुरुस्त करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEknath Shindeएकनाथ शिंदेRaju Shettyराजू शेट्टी