शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील ‘अमेरिकन मिशन’ची जमीन वेगाने हडप, मालकी स्पष्ट होण्यापूर्वीच कब्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 16:19 IST

महापालिका, महसूल यंत्रणाची बघ्याची भूमिका

कोल्हापूर : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी अमेरिकन मिशन बंगला नावाने असलेल्या ५७ एकर १७ गुंठे जमीन हडपण्याचा वेग अलीकडे कमालीचा वाढला आहे. जमिनीची मालकी स्पष्ट होण्याआधीच पत्र्याचे संरक्षक भिंत उभारून जमिनीवर कब्जा मिळवण्याची जणू स्पर्धाच लागल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे महापालिका, महसूल यंत्रणा बघ्याची भूमिका घेत आमचा काय संबंध असा व्यवहार करीत असल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे शहराच्या मध्यवस्तीतील कोट्यवधी रुपयांच्या जमिनीचा विल्हेवाट लागत आहे.मध्यवस्तीमधील कनाननगर ते शाहूपुरी पोलिस ठाण्यापर्यंतची संस्थान काळापासून 'अमेरिकन मिशन बंगला' नावे नोंद असलेली जमीन सरकार हक्कातील (ब सत्ता प्रकार) होती. जमिनीचे खासगी सत्ता प्रकार (क) करण्यात आले. त्याची तक्रार झाल्यानंतर विभागीय आयुक्तांनी सत्ता प्रकार बदलाच्या आदेशाचे पुनरावलोकन करण्याचा आदेश दिला होता. यानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २५८(१) प्रमाणे म्हणजे जमिनीची मालकी ठरवण्यासंंबंधीची सुनावणी जिल्हाधिकाऱ्यांसमोर झाली. त्याचा निकाल लागला नाही.दरम्यान, राज्य सरकार बदललेे. सुनावणीचा निकाल लटकला. जिल्हाधिकारी बदलाच्या चर्चा सुरू झाल्या.यामुळे बळकावलेली जमीन आमचीच झाल्याची भावना अनेकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यांनी राजकीय नेत्यांना हाताशी धरून जमिनीचा निकाल आपल्या बाजूने देणारा अधिकारी आणण्याची सुपारी देऊन सूत्रे हालवत आहेत. यातून खोक्याचा व्यवहार वाढल्याने खुली जमीन दिसले त्यावर पत्रे मारून कब्जा घेतला जात आहे. हे दिवसाढवळ्या खुलेआम सुरू असतानाही कोणतीही शासकीय यंत्रणा ती रोखण्यासाठी पुढे येत नाही, यामागे राजकीय, आर्थिक सत्ता आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.जमीन वादग्रस्त असतानाही परवानगी कशी ?जमीन सरकारी असल्याबाबतचे सर्व पुरावे दिले आहेत. याउलट जमीन सरकारी नाही, असे म्हणणाऱ्यांनी एकही सबळ कागद सुनावणीत दिलेले नाही. यामुळे जमीन सरकारीच आहे, असा दावा तक्रारदारांचा आहे. यावरून जमीन वादग्रस्त असल्याचे स्पष्ट होते. तरीही या जमिनीवर पत्रे लावून जमिनीचा कब्जा घेण्याचा परवाना महापालिका नगररचना विभाग कसा देऊ शकते, असा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

प्रकरण हायकोर्टात जाण्याची शक्यतामहसूल यंत्रणेकडून मालकीसंंबंधीचा निकालही लावला जात नाही. जमिनीवर बेसुमार अतिक्रमण होत आहेत. यामुळे हे प्रकरण आता उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर