शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ‘हिरकणी’ दाखल; पेंचमधून आणलेल्या ‘लाडो’चे नामकरण, वाघांची संख्या झाली सहा

By संदीप आडनाईक | Updated: February 7, 2026 16:53 IST

बोटीने प्रवास करून कोयना अभयारण्यात पोहोचवण्यात आले

कोल्हापूर: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तिसऱ्या वाघीणीचा समावेश झाला आहे. मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पातून आणलेली ही लाडो नावाची वाघीण आज, शनिवारी सकाळी कोयना अभयारण्यात नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आली. यामुळे सह्याद्री मधील एकूण वाघांची संख्या आता सहा झाली आहे. लाडो ही वाघीण गुरुवारी सायंकाळी ५ वाजता पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागलवाडी वनपरिक्षेत्रातून पकडली होती. त्यानंतर रस्ते मार्गाने तिला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणण्यात आले. पुढे बोटीने प्रवास करून शुक्रवारी रात्री कोयना अभयारण्यात पोहोचवण्यात आले. येथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची सखोल तपासणी केली. तिला पाणी व मांसाहार देण्यात आला असून, तो तिने व्यवस्थित स्वीकारला. शनिवारी सकाळी ६ वाजता कोयना अभयारण्याच्या कोअर जंगल क्षेत्रातील सुरक्षित ठिकाणी तिला मुक्त करण्यात आले. कोयना अभयारण्यात आधीपासून असलेल्या नर वाघ एसटीआर-०३ ‘बाजी’च्या जोडीला ही नवीन वाघीण एसटीआर-०६ दाखल झाल्याने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढली आहे. यामुळे भविष्यात वन्यजीव संवर्धनासह पर्यटनालाही चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. १,१६५ चौ. किमी क्षेत्रफळ पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगलीकोल्हापूर या तीन जिल्ह्यांत पसरलेला १,१६५ चौ. किमी क्षेत्रफळाचा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जैवविविधतेने समृद्ध असून, अनेक दुर्मिळ प्रजातींचे आश्रयस्थान आहे. हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. यांनी घेतला सहभाग हे संपूर्ण ऑपरेशन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले. उपसंचालक किरण जगताप, सहाय्यक वनसंरक्षक बाबा हाक्के, परिक्षेत्र वनाधिकारी संग्राम गोडसे (फिरते पथक), अक्षय साळुंखे (कोयना), विजय बाटे (बामणोली), तुषार जानकर (पाटण), अक्षय करमळकर (कांदाट), मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, सुनील भोईटे तसेच वनपाल व वनरक्षकांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

पेंच व्याघ्र प्रकल्पात या वाघीणीचा क्रमांक होता पिटीआर -१२३

सह्याद्रीतील ‘हिरकणी’ पेंच व्याघ्र प्रकल्पात या वाघीणीचा क्रमांक पिटीआर -१२३ होता. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दाखल झाल्यानंतर तिला एसटीआर-०६ हा शासकीय क्रमांक देण्यात आला असून, सह्याद्रीतील गाईड मंडळींनी तिला प्रेमाने ‘हिरकणी’ असे नाव दिले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Hirkani Arrives at Sahyadri Tiger Reserve; Tiger Count Reaches Six

Web Summary : A tigress named 'Hirkani,' formerly 'Ladoo' from Pench, joins Sahyadri, boosting tiger count to six. Relocated via road and boat, she was released into Koyna sanctuary. This enhances conservation and tourism prospects in the 1,165 sq km reserve.