शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

Kolhapur News: राजाराम कारखान्याची निवडणूक लांबणीवर टाकण्यासाठीच अर्हता दिनांकाचा मुद्दा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 13:09 IST

‘राजाराम’ कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपून जवळपास अडीच वर्षे झाली

कोल्हापूर : कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक कोणत्याही परिस्थित लांबणीवर टाकण्यासाठीच कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. त्यातूनच मतदार यादीचा अर्हता दिनांकाचा मुद्दा उपस्थित केला जात असला तरी कायद्याने आता बदलणे अडचणीचे आहे. त्यामुळे ३१ ऑक्टोबर २०२२ ही अर्हता दिनांक निश्चित करून व्यक्ती सभासदांची नावे ऑक्टोबर २०२० तर संस्था सभासदांची नावे ऑक्टोबर २०१९ पर्यंतची पात्र ठरणार आहेत.‘राजाराम’ कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपून जवळपास अडीच वर्षे झाली आहेत. कोरोनानंतर सभासद यादीवरून ही निवडणूक लांबणीवर पडली आहे. सत्तारूढ गटाने कार्यक्षेत्राबाहेरील सभासद वाढवल्याची हरकत १३४६ सभासदांवर विरोधकांनी घेतली होती. साखर सहसंचालक, सहकारमंत्री, उच्च न्यायालयात हे सभासद अपात्र ठरले आहेत. त्यानंतर सत्तारूढ गटाने सर्वोच्च न्यायलयात दाद मागितली आहे. याबाबत बुधवारी (दि. ४) सुनावणी होत आहे. या सुनावणीमध्ये निकाल अपेक्षित आहे. न्यायालयाची निवडणुकीला स्थगिती नसताना निवडणूक प्रक्रिया थांबवली कशी? याबाबत विरोधी गटाने साखर सहसंचालकांकडे निवेदन देऊन विचारणा केली. यावर, शुक्रवारपर्यंत ‘ब’ वर्ग संस्था गटाची यादी मागवली जाईल, असे सांगण्यात आले. तोपर्यंत सत्तारूढ गटाने मतदार यादीची अर्हता दिनांक बदलून तो ३१ मार्च २०२३ करावा, अशी मागणी केली. यामागे कारखान्याची निवडणूक लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न आहे. मात्र, ११ नोव्हेंबर २०२१ च्या सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार अर्हता दिनांक निश्चित करून प्रक्रिया सुरू झाली आहे. न्यायालयात याच कालावधीतील वाढीव सभासदांचा वाद सुरू असल्याने सत्तारूढ गटाच्या मागणी मान्य होण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे अर्हता दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ हीच राहणार हे निश्चित आहे.

अर्हता बदलली तर ९८ सभासद वाढणारसत्तारूढ गटाच्या म्हणण्याप्रमाणे मतदार यादीची अर्हता दिनांक ३१ मार्च २०२३ केली, तर ९८ सभासद वाढणार आहेत.

दृष्टिक्षेपात ‘राजाराम’ कारखाना -कार्यक्षेत्र : करवीर, राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा, हातकणंगले.व्यक्ती सभासद : १७३२०संस्था सभासद : १४३

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक