शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती घराण्यातील दत्तक प्रकरण हा घरगुती वाद, प्रचाराचा मुद्दाच नाही; राजवर्धन कदमबांडे स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 12:49 IST

कोल्हापूर : ‘मी भाजपचा एक कार्यकर्ता आहे, पक्षाच्या सूचनेनुसार मी येथे कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघातील महायुतीच्या प्रचारासाठी आलो आहे. ...

कोल्हापूर : ‘मी भाजपचा एक कार्यकर्ता आहे, पक्षाच्या सूचनेनुसार मी येथे कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघातील महायुतीच्या प्रचारासाठी आलो आहे. १९६२ मधील छत्रपती घराण्यात घडलेले दत्तक प्रकरण हा घरगुती वाद होता. तो या प्रचाराचा मुद्दा होत नाही. त्यामुळे याविषयी मी अधिक बोलणार नाही, अशा शब्दांत स्पष्टीकरण स्वर्गीय पद्माराजे यांचे पुत्र माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिले.कोल्हापूरच्या गादीचे खरे वारसदार व खोटे वारसदार कोण हे जनताच ठरवेल. मला त्यावर काही भाष्य करायचे नाही. मी मात्र राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या रक्ताचा तसेच विचारांचा वारसदार आहे, असे कदमबांडे यांनी सांगितले.

शाहू छत्रपती संपत्तीचे वारसदारमहाआघाडीचे उमेदवार हे देखील छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचे वारसदार आहेत, याकडे लक्ष वेधले असता कदमबांडे म्हणाले की, आत्ताचे शाहू छत्रपती हे छत्रपती शहाजी महाराज यांचे वारसदार असू शकतात, संपत्तीचे वारसदार असू शकतात; पण राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वारसदार होऊ शकत नाही. त्यांना दत्तक घेताना कोल्हापुरात काय वाद झाला होता याबद्दल आपण जाणून आहात. त्यांना कोल्हापूर शहरात जागाही मिळाली नाही. तरीही हा वाद घरगुती आहे. त्याबद्दल मला अधिक बोलायचे नाही.

केवळ प्रचारासाठी आलोयप्रचाराच्या निमित्ताने आपणास हा वाद चव्हाट्यावर आणण्यासाठी भाजपने पाठविले आहे का असे विचारले असता, दत्तक प्रकरण हा राजकीय प्रचाराचा विषय होऊ शकत नाही. मी भाजपचा कार्यकर्ता असल्याने पक्षाच्या आदेशाने एक कर्तव्य म्हणून येथे केवळ प्रचारासाठी आलो आहे. जुने वाद उकरून काढण्यासाठी नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Shahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती