शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘पाटबंधारे'ने पाणी तोडले... मनपाने सीलच ठोकले; कोल्हापुरात थकबाकीवरून सरकारी कार्यालयांत जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 11:57 IST

नगरसेवकांचा वाद कमी तोपर्यंत सरकारी कार्यालयांत जुंपली

कोल्हापूर : गेल्या काही वर्षांत पंचगंगा नदीतून उचलेल्या पाण्याच्या बिलापोटीची थकबाकी भरली नाही म्हणून जलसंपदा विभागाने शुक्रवारी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बालिंगा, नागदेववाडी येथील उपसा पंप सील केले. परिणामी दुपारनंतर शहराच्या बहुतांश पाणीपुरवठा खंडित झाला.या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून आक्रमक झालेल्या महापालिका घरफाळा विभाग, तसेच पाणीपुरवठा विभागाने थकबाकी भरली नाही म्हणून सिंचन भवन परिसरातील जलसंपदा विभागाची सर्व १७ कार्यालये सील केली. पाच नळकनेक्शन तोडली. त्यामुळे दिवसभर महापालिका आणि जलसंपदा विभागात त्याचे तीव्र पडसाद उमटले.दुपारी महापालिकेत झालेल्या बैठकीतूनच महापौर रूपाराणी निकम यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, तसेच जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ‘पीए’शी बोलून झालेल्या सगळा घटनाक्रम आणि शहराचा पाणीपुरवठा खंडित झाल्याचे सांगितले. सायंकाळी मंत्री पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांच्याशी बोलून पाणीपुरवठा सुरू करण्याच्या सूचना दिल्या. या वादावर पडदा पडला.

वारंवार सूचना नोटीस देऊनही महापालिकेने १६५ कोटींची थकबाकी न भरल्याने आणि ही थकबाकी भरण्याबाबत कोणतीही ग्वाही न दिल्यामुळे जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता माने यांनी सहकारी कर्मचाऱ्यांबरोबर जाऊन नागदेववाडी व बालिंगा येथे जाऊन पाणीपुरवठा बंद केला. याची माहिती कळताच अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, जलअभियंता हर्षजित घाटगे यांनी तेथे जाऊन माने यांच्याशी चर्चा करताना पाणीपुरवठा बंद करू नका, अशी विनंती केली; पण त्यांनी त्यांचे ऐकले नाही.

महापालिका प्रशासनही आक्रमक; १७ कार्यालयांना ठोकले कुलूपपाणीपुरवठा खंडित केल्याने आक्रमक झालेल्या महापालिका प्रशासनानेही जलसंपदा विभागावर कारवाई सुरू केली. घरफाळ्याची, तसेच पाणीपट्टीची थकीत रक्कम भरली नाही म्हणून सिंचन भवनातील जलसंपदा विभागाची १७ कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बाहेर काढून, लाइट बंद करून ती सील केली. त्या ठिकाणी तणाव निर्माण झाला. या कारवाईच्या वेळी चारही विभागीय कार्यालयांतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कुलुपे कमी पडलीजलसंपदा विभागाची कार्यालये सील करण्यास तीन-चार कुलुपे घेऊन गेल्या महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना कुलपे कमी पडली. तथे सतरा कार्यालये आहेत. त्यामुळे नंतर आणखी कुलुपे आणावी लागली.

पाणीपुरवठा सुरू करा; मंत्री पाटील यांच्या सूचनादुपारी साडेतीन वाजता महापौर रूपाराणी निकम यांनी कार्यकारी अभियंता माने यांना आपल्या कार्यालयात बोलवून घेतले आणि थकबाकीसंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. सणवार असताना थकबाकी वसुलीसाठी जनतेला वेठीस धरणे योग्य नाही. तुम्ही आमच्याकडे यायला पाहिजे होता. मीडियाला सोबत घेऊन जात केलेली कारवाई अत्यंत चुकीची आहे. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीतून महापौर निकम यांनी मंत्री चंदक्रांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि पाणीपुरवठा सुरू करण्याची विनंती केली. मंत्री पाटील यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी चर्चा करून पाणीपुरवठा सुरू करण्याच्या सूचना माने यांना दिल्या.

नगरसेवकांनी व्यक्त केला संतापमहापौर निकम यांच्यासह स्थायी सभापती विशाल शिराळे, गटनेते मुरलीधर जाधव, आदिल फरास यांनी बैठकीत जलसंपदा विभागाच्या कारवाईवर तीव्र संताप व्यक्त केला. थकबाकीसाठी पाणीपुरवठा खंडित करण्याची आवश्यकता नव्हती, अशा शब्दांत फरास यांनी संताप व्यक्त केला. महापौर निकम यांनी थकबाकीचा वाद होता तर तो चर्चेतून संपविता आला असता, असे सांगत निषेध व्यक्त केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Water Cut Sparks Clash: Kolhapur Departments Fight Over Unpaid Dues

Web Summary : Kolhapur faced water disruption after irrigation dept. sealed supply pumps over unpaid bills. In retaliation, the municipality sealed 17 irrigation offices for outstanding taxes, escalating the conflict. Intervention from ministers led to restoring water supply, resolving the immediate crisis.