शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालय प्रशासनाने घोषित केले मृत, अंत्यसंस्काराचीही झाली तयारी; अन् 'ती' वृद्धा झाली जिवंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 17:06 IST

अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच त्यांच्या शरीराची हालचाल सुरु झाली. नातेवाईकांनी एका खासगी डॉक्टरांकडून तपासणी केली. त्यात त्यांचा श्वासोच्छ्वास सुरू असल्याचे आढळले.

इचलकरंजी : येथील सेवासदन निरामय रुग्णालयात एका अत्यवस्थ वृद्धेला मृत घोषित केले. तिच्या अंत्यसंस्काराची तयारीही सुरु झाली.  याचवेळी तिच्या शरीराची हालचाल होत असल्याचे दिसले. हे पाहून नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. गोंधळ वाढून तणाव निर्माण  होत असल्याने पोलिसांनी हस्तक्षेप केला. परंतु याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती. यशोदा दत्तात्रय सुतार (वय ८१, रा. खोतवाडी ता. हातकणंगले) असे त्या वृद्धेचे नाव आहे. या वृद्ध महिलेवर याच सेवासदन निरामय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, यशोदा या तोल जाऊन घरात पडल्याने त्यांना शनिवारी उपचारासाठी इचलकरंजीतील सेवासदन निरामय प्रा ली या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आले होते. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी त्यांना रुग्णालय प्रशासनाने मृत घोषित केले. तेथून नातेवाईकांनी यशोदा यांना घरी नेले. अंत्यसंस्काराच्या तयारीवेळी जाणवली हालचालअंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच यशोदा यांच्या शरीराची हालचाल होत असल्याचे दिसले. म्हणून नातेवाईकांनी एका खासगी डॉक्टरांकडून तपासणी केली. त्यात त्यांचा श्वासोच्छ्वास सुरू असल्याचे आढळले. त्यामुळे चिडून नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. रात्री उशिरापर्यंत त्या वृद्धेवर त्याच रुग्णालयातच उपचार सुरू होते. याबाबत रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क झाला नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजी