शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

..अखेर हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरींचे मानधन मिळाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 12:42 IST

याबाबत ‘लोकमत’ने फोडली होती वाचा

कोल्हापूर : गेल्या बारा महिन्यांपासून रखडलेले हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडूंच्या मानधनाचा प्रलंबित प्रश्न शासनाच्या क्रीडा विभागाकडून मार्गी लावण्यात आला असून, या खेळाडूंचे सुधारित मानधन क्रीडाधिकारी कार्यालयाकडे वर्ग केले असून, खेळाडूंच्या खात्यात दोन दिवसांत जमा होणार आहे.याबाबत ‘लोकमत’ने 'हिंद केसरींचे मानधन सहा महिन्यांपासून रखडले' या मथळ्याखाली १२ ऑक्टोबर २०२४ रोजी वृत्त प्रसिद्ध करून याला वाचा फोडली होती. याची दखल घेत सांगोला (जि. सोलापूर) येथील आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनीही २१ डिसेंबरला नागपूरच्या अधिवेशनात विधानसभेत प्रश्न उपस्थित करत रखडलेले व घोषणा केलेले वाढीव मानधन त्वरित देण्याची मागणी केली होती. अखेर सरकारने ११ मार्चला याचा अध्यादेश काढून १ कोटी ३८ लाख ५७ हजार ५०० रुपये इतकी रखडलेली मानधनाची रक्कम क्रीडाधिकारी कार्यालयाकडे वर्ग केली आहे. येत्या दोन दिवसांत ही रक्कम खेळाडूंच्या खात्यावर जमा होणार आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील १७ खेळाडूंना २२ लाख ८७ हजार ५०० रुपये मानधन मिळणार आहे. पूर्वी पैलवानांना सहा हजार मानधन होते. सरकारने ते पंधरा हजार रुपये करण्याची घोषणा केली होती. मात्र, तेही रखडल्याने पैलवान अस्वस्थ होते. अखेर राज्य सरकारने शब्द पाळत सुधारित मानधन वर्ग केले आहे.

क्रीडा अधिकारी यांचा सत्कारपैलवान संग्राम कांबळे यांनीही क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन रखडलेले मानधन त्वरित देण्याची मागणी केली होती. याचा अध्यादेश काढल्याने कांबळे यांनी जिल्हा क्रीडाधिकारी नीलिमा अडसूळ यांचा सत्कार करत आभार मानले. उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील, क्रीडाधिकारी अरुण पाटील, पैलवान कुलदीप कांबळे, पैलवान चंद्रदीप कांबळे, पैलवान सचिन राठोड, पैलवान दत्तात्रय ठाणेकर उपस्थित होते.

पैलवानांच्या रखडलेल्या मानधनाबाबत ‘लोकमत’ने वाचा फोडली होती. ‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळेच आम्हाला न्याय मिळाला आहे. - दीनानाथसिंह, हिंदकेसरी पैलवान

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWrestlingकुस्तीGovernmentसरकार