रुकडी माणगाव : माणगाव येथे १९२० मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची ऐतिहासिक भेट झाली होती. या भेटीचे चित्रण विश्वविक्रमी रांगोळीतून ताराराणी ब्रिगेड यांच्यावतीने साकारण्यात आले आहे. यासाठी साडेआठ टन रांगोळीचा वापर केला आहे.
रांगोळीसाठी समीर काळे यांच्या मार्गदर्शनसह कलाकार मोनाली पाटील व आशा चव्हाणसह प्रतिष्ठानचे ११ रंगारी व १५० युवती, महिला दररोज दहा तास चित्र रेखाटत होत्या. ही रांगोळी सोमवारपर्यंत पाहण्यासाठी खुली राहणार आहे.रांगोळीची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड विविध रेकॉर्डमध्ये होणार आहे. माणगाव येथे स्वराज्य युवा प्रतिष्ठान ताराराणी ब्रिगेडमार्फत विश्वविक्रमी रांगोळी साकारल्यामुळे माणगावचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले, असे प्रतिपादन सरपंच डाॅ. राजू मगदूम यांनी केले. माणगाव परिषदेस १०६ वर्षे पूर्ण झाली आहेत. याचे औचित्य साधून येथील जागेवर २५ डिसेंबरपासून ही रांगोळी रेखाटनास प्रारंभ करण्यात आला आहे. यासाठी साडेआठ टन रांगोळीचा वापर केला आहे. रांगोळीसाठी समीर काळे यांच्या मार्गदर्शनसह कलाकार मोनाली पाटील व आशा चव्हाणसह प्रतिष्ठानचे ११ रंगारी व १५० युवती, महिला दररोज दहा तास चित्र रेखाटत होत्या.प्रारंभप्रसंगी उपसरपंच विद्या जोग, वैभव कांबळे, स्वराज्य युवा प्रतिष्ठानचे समीर काळे, सुहास लाटवडेकर, सहायक उपनिरीक्षक वाकळे, सुरजित चव्हाण, मारुती पाटील, अमित भोरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. स्वराज्य युवा प्रतिष्ठान ताराराणी ब्रिगेडच्या महिला रणरागिणी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक सादर केले.
Web Summary : A historical meeting between Dr. Babasaheb Ambedkar and Shahu Maharaj in Mangaon, 1920, was recreated in a world-record Rangoli using 8.5 tons of Rangoli. The Tararani Brigade organized this, with 150 women working ten hours daily. The event marks 106 years of the Mangaon conference.
Web Summary : माणगांव में 1920 में डॉ. बाबासाहेब आंबेडकर और शाहू महाराज की ऐतिहासिक मुलाकात को 8.5 टन रंगोली का उपयोग करके विश्व रिकॉर्ड रंगोली में दर्शाया गया। ताराराणी ब्रिगेड ने इसका आयोजन किया, जिसमें 150 महिलाओं ने प्रतिदिन दस घंटे काम किया। यह आयोजन माणगांव सम्मेलन के 106 साल पूरे होने पर किया गया है।