शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: राधानगरीतील हत्तीमहलचा कायापालट होणार, १५ कोटींचा आराखडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 18:26 IST

गौरव सांगावकर राधानगरी : येथील राजर्षी शाहू महाराजांचा ऐतिहासिक ठेवा अनेक वर्षे उपेक्षित आणि दुर्लक्षित आहे. याच हत्तीमहलच्या मोडकळीस ...

गौरव सांगावकरराधानगरी : येथील राजर्षी शाहू महाराजांचा ऐतिहासिक ठेवा अनेक वर्षे उपेक्षित आणि दुर्लक्षित आहे. याच हत्तीमहलच्या मोडकळीस आलेल्या भिंतींना अखेर बळ मिळणार आहे. हत्तीमहलचा कायापालट होणार असून, परिसरात निसर्ग माहिती केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे.अनेक जिल्ह्यातून पर्यटक दाजीपूर, राधानगरी, हत्तीमहल येथे भेट देत असतात. पण, शंभर वर्षांपूर्वीची ही वास्तू पहावयास येणाऱ्या पर्यटकांच्या पदरी मात्र निराशा पडते. कारण ''हत्तीमहल'' हा ऐतिहासिक ठेवा झाडा झुडपांनी वेढलेला आहे. अनेक वेळा निधी मंजूर झाले, पण झाडाझुडपांची स्वच्छता या व्यतिरिक्त महलाच्या पदरी काहीही पडलेले नाही. पण, हाच ठेवा आता मोकळा श्वास घेण्याच्या मार्गावर आहे. यासाठी वन विभागाकडून राधानगरी येथील हत्तीमहलसाठी १५ कोटी निधी खर्चून निसर्ग माहिती केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. या माहिती केंद्रामध्ये अभयारण्यातील विविध वनस्पती, सस्तन प्राणी, पक्षी कीटक, यांची माहिती असणार आहे. याचबरोबर या केंद्रात निरीक्षण मनोरे, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा, गेस्ट हाऊस, लाकडी घरे, डायनिंग हॉल, फिरण्यासाठी दगडी रस्ता, कारंजे, प्राण्यांची दगडी शिल्प, ग्रंथालय, पार्किंग तसेच तिकीट काउंटर असणार आहे.

 

 

राधानगरी पर्यटनाला चालना देण्यासाठी तसेच राजर्षी शाहूंचे ऐतिहासिक वारसा स्थळ जतन करण्याच्या दृष्टीने पर्यटन आराखडा तयार केला असून, शासन स्तरावर लवकरच निधीची तरतूद होईल. - सुहास पाटील, वनक्षेत्रपाल, राधानगरी.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरradhanagari-acराधानगरीtourismपर्यटन