शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गोविंद पानसरे हत्या प्रकरण: तावडे, कळसकर, अंदुरे व गायकवाडला न्यायालयात केलं हजर; सुनावणी पुढे ढकलली

By तानाजी पोवार | Updated: July 27, 2022 18:27 IST

पुढील सुनावणीस सर्व संशयितांना हजर ठेवण्याचे आदेश

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी दोष निश्चिती सुनावणीवेळी सर्व संशयित आरोपी उपस्थित नसल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली. ही सुनावणी दि. ५ ऑगस्ट रोजी होणार आहे. आज, बुधवारी न्यायालयात संशयित डॉक्टर वीरेंद्र तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर व समीर गायकवाड हे उपस्थित होते.कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात जिल्हा न्यायाधीश तीन एस. एस. तांबे यांच्यासमोर ही सुनावणी सुरू आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे उपस्थित होते.आजच्या सुनावणीस वीरेंद्र तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे व समीर गायकवाड हे चार संशयित न्यायालयात उपस्थित होते. इतर पाच संशयित हे बेंगलोर येथील कारागृहात असल्याने तांत्रिक अडचणीमुळे उपस्थित राहू शकले नाहीत.  दोष निश्चिती सुनावणीवेळी सर्व संशयित आरोपी न्यायालयात समोर असावेत व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे त्यांची सुनावणी घेऊ नये अशी विनंती आरोपींचे वकील अॅड. समीर पटवर्धन यांनी न्यायालयाकडे केली. त्यानुसार पुढील सुनावणी दि. ५ ऑगस्ट रोजी होणार आहे, त्यावेळी सर्व संशयितांना हजर ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovind Pansareगोविंद पानसरेCrime Newsगुन्हेगारी