शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

उद्योगपती आनंद महिंद्रांनी झेंडा लावताना ट्विट केलेल्या 'त्या' फोटोतील आजी कोल्हापूरच्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 12:38 IST

या फोटोची सर्वत्र जोरदार चर्चा

मोहन सातपुतेउचगाव : महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. समाजातील विविध घडामोडींची ते आवर्जुन दखल घेत असतात आणि त्यावर आपली भूमिका देखील स्पष्ट करत असतात. आनंद महिंद्रा यांनी 'हर घर तिरंगा' अभियानाला साथ देत एक खास फोटो ट्विट केला होता. "स्वातंत्र्यदिनाचा एवढा गवगवा का केला जातोय असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर या दोघांना विचारा. कोणत्याही लेक्चरपेक्षा हे दोघं तुम्हाला चांगलं समजावून सांगतील. जय हिंद" असं आनंद महिंद्रा यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. या फोटोची सर्वत्र जोरदार चर्चा झाली. तो फोटो आहे कोल्हापुरातील उचगाव येथील हिंदुराव दत्तात्रय पाटील (वय -७६) व त्याच्या पत्नी रुक्मिणी हिंदुराव पाटील (७२) यांचा.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील प्रत्येक नागरिकाला देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन केलं होतं. या उपक्रमात उचगाव येथील हिंदुराव दत्तात्रय पाटील व त्याच्या पत्नी रुक्मिणी पाटील दाम्पतंय ही जोशाने सामील झाले. आपल्या उतरत्या वयातही या दाम्पत्याने घरावर झेंडा लावण्यासाठी पतीचा सहारा घेत लोखंडी बॅरेल वर उभे राहून रुक्मिणी पाटील यांनी घरावर ध्वज लावला.गल्लो गल्ली मधील तिरंग्याचा माहोल कॅमेऱ्यामध्ये टिपत असताना विक्रम चोगुले यांनी पाटील पती पत्नीचा हा फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. हा फोटो बघता बघता इतका व्हायरल झाला की या फोटोची दखल महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनीही घेतली.पती-पत्नी दोघांच्या आधाराने चालवतात संसारहिंदुराव पाटील हे शाहू मिल येथे फिडर पदावरून निवृत्त झाले आहे. शाहू मिल बंद पडली आणि गरिबीचे दिवस आले. उचगाव मध्ये गेली ४०वर्षापासून ते राहतात. पत्नी रुक्मिणीच्या आधाराने ते संसार चालवतात. त्याचे मुळ गाव पुनाळ (ता.पन्हाळा) आहे. त्याचा मुलगा दिलीप पाटील सेंट्रिंग कामगार आहे.

पूर्वी शाळा व महाविद्यालयात झेंडा वंदन कार्यक्रमात जातं असतं. प्रमुख पाहुण्याच्या हस्ते फडकवलेला राष्ट्र ध्वज मनाला उभारी देत होता. आता स्वतःच घरावर फडकवल्याचा आनंद द्विगुणित झाला आहे  - हिंदुराव व रुक्मिणी पाटील, उचगाव

प्रत्येकाच्या घरात लोकशाहीमार्गाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने संविधान रुपी राष्ट्रध्वज घरावर लावण्याचे स्वतंत्र मिळाले. पाटील पती-पत्नीने आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवत असताना मी हा फोटो कैद केला. त्याची दखल आनंद महिंद्रा यांनी घेतली याचा आनंद झाला. - विक्रम चोगुले, उचगाव

टॅग्स :kolhapurकोल्हापूरIndependence Dayस्वातंत्र्य दिनAnand Mahindraआनंद महिंद्रा