शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: करवीर, हातकणंगलेत ठिय्या मारलेले ग्रामपंचायत अधिकारी अखेर बदलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 12:54 IST

सहा तास चाललेल्या प्रक्रियेद्वारे ११३ बदल्या

कोल्हापूर : करवीर, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यांत अनेक वर्षे ठिय्या मारलेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या उर्वरित नऊ तालुक्यांत मंगळवारी बदल्या करण्यात आल्या. तब्बल सहा तास चाललेल्या या प्रक्रियेत ११३ बदल्या करण्यात आल्या. अनेकांची या तालुक्यातून उचलबांगडी केल्याने काहीशी नाराजी व्यक्त करण्यात येत होती.मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव आणि सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये समुपदेशनाच्या माध्यमातून या बदल्या करण्यात आल्या. २३ मे २०२५च्या शासन निर्णयानुसार या बदल्या करण्यात आल्या. प्रशासकीय आणि विनंती व आपसी बदली करताना समानीकरणाचे तत्त्व पाळले गेल्यामुळे अनेकांना बदल्यांवेळी मोठी उत्सुकता होती. ज्येष्ठता यादीनुसार समुपदेशनावेळी रिक्त जागांची निवड करता येत असल्याने कनिष्ठांना मिळेल त्यातील गाव निवडावे लागत होते.

ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या ८२ प्रशासकीय, विनंती ११, आपसी २०, अशा एकूण ११३ बदल्या करण्यात आल्या. तर पंचायत विभागाच्या विस्तार अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय एक आणि विनंती दोन, अशा तीन बदल्या करण्यात आल्या. सर्व बदली पात्र ग्रामपंचायत अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी संघटना पदाधिकाऱ्यांच्या समोर पडद्यावर संगणक प्रणालीद्वारे रिक्त जागा दाखवून पारदर्शीपणे या बदल्या करण्यात आल्या असल्याचे जिल्हा परिषदेच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

शाळेसारखा गोंधळविद्यार्थी जसा दंगा आणि गोंधळ घालतात तसे वातावरण बदलीच्या ठिकाणी दिसून येत होते. जिल्हा परिषदेच्या चौथ्या मजल्यावरील नवीन सभागृहात ही प्रक्रिया झाल्याने या मजल्यावर मोठी गर्दी झाली होती. सभागृहातही एखाद्याचा गाव निवडताना गोंधळ झाला की बाकीचे त्यांना सूचना करत होते. त्यामुळे सातत्याने सर्वांना बोलू नका, शांत राहा अशा सूचना द्याव्या लागत होत्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतTransferबदली