शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

‘जय श्रीराम’च्या जयघोषात राज्यातील पहिली रेल्वे कोल्हापुरातून अयोध्येकडे रवाना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेला प्रारंभ

By संदीप आडनाईक | Updated: September 28, 2024 18:35 IST

श्रीराम, भरत, सीता आणि हनुमानाच्या वेशभूषेतील कलाकारांनी सर्वांचे स्वागत केले

कोल्हापूर : ‘जय श्रीराम, जय जय श्रीराम’च्या जयघोषात शनिवारी कोल्हापुरातून ८०० प्रवासी तीर्थदर्शनासाठी विशेष रेल्वेने अयोध्येकडे रवाना झाले. भगव्या पताका, फेटे, टोप्या, उपरणे परिधान केलेल्या प्रवाशांवर गुलाबपुष्पांची उधळण करण्यात आली. रेल्वे फुलांच्या माळा आणि फुगे बांधून सजविण्यात आली होती. कावड हातात घेतलेले मुख्यमंत्र्यांचा मुखवटा असलेले श्रावणबाळाच्या तसेच श्रीराम, भरत, सीता आणि हनुमानाच्या वेशभूषेतील कलाकारांनी सर्वांचे स्वागत केले.सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रारंभ केला. वैद्यकीय शिक्षण व विशेष साहाय्य मंत्री आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. मुख्यमंत्री शिंदे यांनी व्हिडिओद्वारे शुभेच्छा संदेश देताना अंबाबाईला वंदन करून राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन केले. ते म्हणाले, या योजनेचा प्रारंभ दक्षिण काशी, अंबाबाईच्या करवीरमधून होतो आहे याचा मनापासून आनंद होत आहे. मुश्रीफ म्हणाले, या योजनेतील पहिली रेल्वे कोल्हापुरातून जातेय हे माझे भाग्यच आहे. खासदार धैर्यशील माने यांनी या योजनेची सुरुवात कोल्हापुरातून केल्याबद्दल मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले.

कोल्हापूर जिल्ह्याने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या शुभारंभाचा मान पटकावला आहे. या योजनेचा आता राज्यभरातील सर्वच जिल्ह्यांतील लोकांना लाभ मिळेल. त्याबद्दल जिल्हा समिती, पालकमंत्री यांचे विशेष अभिनंदन. -विलास निवृत्ती कांबळे, बेलवळे बुद्रुक, ता. कागल 

श्रावणबाळाप्रमाणे सरकारने ज्येष्ठ व्यक्तींना तीर्थाटनाची सोय करून दिली ही आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे. - मालन दिनकर डवर, चंदगड

तीर्थयात्रेत सहभागी ज्येष्ठांसाठी रेल्वेत औषध, वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. जेष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेतली जाईल, अशी अपेक्षा आहे. -प्रकाश रामचंद्र कांबळे, गोरंबे

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAyodhyaअयोध्याrailwayरेल्वेHasan Mushrifहसन मुश्रीफ