शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पहिली भटक्या कुत्र्यांची शाळा कोल्हापुरात; ४०० श्वानांची सोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 19:30 IST

९० लाख खर्चून उभारण्यात आलेला राज्यातील ही भटक्या श्वानांची पहिलीच शाळा

कोल्हापूर : रोटरी सनराईज, चंद्रकांत हंजारीमलजी राठोड परिवार व सिद्धगिरी मठ यांच्या प्रयत्नातून उभारण्यात येत असलेल्या राज्यातील पहिल्या भटक्या श्वान शाळेचे उद्घाटन गुरुवारी (दि.१९) होत असल्याची माहिती सचिन मालू यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्या वतीने उभारण्यात आलेल्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन १८ व १९ जानेवारीला होत आहे.शहर आणि परिसरातील अनाथ, नवजात पिल्लू व जखमी श्वानासाठी या श्वान शाळेमधून खाद्य, औषधोपचार व वेळोवेळी लसीकरणाची सोय मोफत करण्यात येणार असून या शाळेत पहिल्या टप्प्यात ४०० श्वानांची सोय होणार आहे. कणेरीमठ येथे ९० लाख खर्चून उभारण्यात आलेला राज्यातील ही भटक्या श्वानांची पहिलीच शाळा आहे. गतवर्षी चालू केलेल्या प्रकल्पाची पूर्तता झाली असून त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या हस्ते होणार आहे. रोटरी सनराईजचे अध्यक्ष ऋषिकेश खोत, राहुल कुलकर्णी, सचिन मालू, व्यंकटेश देशपांडे, नासिर बोरसदवाला, शरद पै, अरुण भंडारी, करुणाकर नायक, सुभाष कुत्ते, अजय मेनन हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.असे प्रकल्प :  बुधवारी (दि. १८) सकाळी १० वाजता स्वयं शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी १५ लाख खर्चून उभारण्यात आलेल्या ई-लर्निंग सुविधा व सेन्सॉर गार्डनचे उद्घाटन. दुपारी ३ वा. कदमवाडी येथील डाॅ. डी. वाय. पाटील हाॅस्पिटल येथे उभारण्यात आलेल्या शिशुरक्षा या विभागाचे तर मणक्यावरील शस्त्रक्रियेसाठी आवश्यक ४० लाखांच्या उपकरणाचे उद्घाटन डाॅ. जी. व्ही. बसवराजा यांच्या हस्ते.  गुरुवारी (दि. १९) सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये देण्यात आलेल्या न्यूरो माॅनिटरिंग मशीन व मॅमोग्राफी युनिटचे उद्घाटन.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdogकुत्राSchoolशाळा