शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

कोल्हापूरची हद्दवाढ थांबविता येणार नाही, राज्यपाल यांनी केले स्पष्ट; विविध मान्यवरांशी केली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 11:53 IST

राज्यपाल यांनी आपण २० वर्षांपूर्वी अंबाबाईच्या दर्शनाच्या निमित्ताने कोल्हापुरात आल्याची आठवण करून दिली

कोल्हापूर : शहरांची लोकसंख्या आणि वाढ आपण रोखू शकत नाही. हद्दवाढ काही काळ आपण थांबवू शकतो परंतु ती कायमस्वरूपी थांबविता येत नाही असे स्पष्ट प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी बुधवारी येथे केले. समाजात शासन, प्रशासन, नागरिक अनेक प्रकारे कामे, विकासकामे करीत असतात. अशावेळी बदल हे चांगल्याप्रकारे पेरले, रुजविले जाणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.राजकीय व सामाजिक गटातील मान्यवरांनी चर्चेत हद्दवाढीचा विषय उपस्थित केला. तत्पूर्वी राज्यपाल यांनी आपण २० वर्षांपूर्वी अंबाबाईच्या दर्शनाच्या निमित्ताने कोल्हापुरात आल्याची आठवण करून दिली. तो संदर्भ घेऊन आपण आल्यापासून आजही कोल्हापूर तसेच आहे. स्थापनेपासून एक इंचही हद्दवाढ झाली नाही. सरकार त्याबाबत गंभीर नाही. हद्दवाढ करण्यात शासन कमी पडते का अशी विचारणा त्यांना करण्यात आली.राज्यपाल यांनी शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील डॉक्टर, वकील, उद्योग क्षेत्रातील व्यक्ती, शेती, कला, क्रीडा, शिक्षण, सामाजिक, राजकीय व माध्यम अशा विविध क्षेत्रातील नागरिकांच्या भेटी घेऊन चर्चा केली. जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन जिल्ह्यातील सद्यस्थितीबाबत आढावा घेतला. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी, इचलकरंजीचे प्रशासक ओमप्रकाश दिवटे, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के उपस्थित होते. शिष्टमंडळातील सदस्यांनी राज्यपालांचे पुष्प देऊन स्वागत केले. स्थानिक पातळीवरील समस्या अडचणी जाणून घेण्यासाठी मी हा उपक्रम सुरू केल्याचे राज्यपालांनी सांगितले. 

केशवराव पूर्वीप्रमाणेच..केशवराव भोसले नाट्यगृहाबाबत विचारणा केल्यावर त्यांनी याबाबत नियोजन केल्यानुसार ते पूर्वीप्रमाणेच करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगितले. त्यांनी गुळाचा वापर मध्यान्ह भोजनात साखरेऐवजी मुलांसाठी करावा याबाबत सुचविलेल्या मुद्दयांवर अधिक चर्चा करू असे आश्वासन दिले. रोजगारक्षम ग्राम संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे सुरू करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

याविषयांवर मागण्या..जिल्ह्यातील उद्योग वाढ, हद्दवाढ, सार्वजनिक आरोग्य सेवा, खंडपीठ, औद्योगिक विकास, रोजगार, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण, शिक्षण क्षेत्रातील समस्या, शेतीसाठी पाणी, पर्यावरण संरक्षण, पुरावर कायमस्वरूपी तोडगा, गुळाचा वापर शालेय स्तरावर मध्यान्ह भोजनात करणे, आरक्षण आदी विषयांवर मागण्या करण्यात आल्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर