शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: मोदी यांनी दहशतवादाविरूद्धचे धोरण जगासमोर ठेवले- राजनाथ सिंह
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

वीजजोडणी तोडण्यासाठी आलेल्या महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यास धक्काबुक्की, कोल्हापुरातील इचलकरंजीत घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 13:42 IST

अटक केलेल्या पाच जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

इचलकरंजी : वीजबिलाच्या थकबाकीपोटी वीजजोडणी तोडण्यासाठी आलेल्या महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यास धक्काबुक्की करणाऱ्या पाच जणांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.नंदकुमार भीमराव लोखंडे, आत्माराम लोखंडे, अर्जुन पाटील, प्रसाद मेटे व योगेश वाघमारे अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी महावितरणचे सहायक अभियंता स्वप्निल यशवंत कोळी यांनी तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शाहूनगर गल्ली नं. एक मध्ये शिवसेनाप्रणीत महाराष्ट्र यंत्रमागधारक सेना राज्याध्यक्ष नंदकुमार लोखंडे यांच्या कारखान्याचे वीजबिल थकीत असल्याने वीजजोडणी तोडण्यासाठी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सुनील अकिवाटे व वरिष्ठ तंत्रज्ञ सागर म्हाकवे गेले होते. त्यावेळी उपरोक्त पाच जणांनी त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. तसेच खांबावरून खाली उतरण्यास मज्जाव केला. त्याचबरोबर कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांनाही धक्काबुक्की करण्यासह त्यांची वाहने अडवत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. तसेच लोखंडे याने शिवसेना शाहूनगर नामक व्हॉट्सॲप ग्रुपवर ‘लाइट कनेक्शन कट करणारे आलेल्या वायरमनना विरोध करा, आपल्या गावात आपली दादागिरी चालते, एक कानफाडीत मारली तरी चालेल’ असा चिथावणीखोर मजकूर व्हायरल केला. या कारणावस्तव लोखंडे याच्यासह पाच जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmahavitaranमहावितरणCrime Newsगुन्हेगारी