शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

खून करून आईचे काळीज खाणाऱ्या नराधमाची फाशी कायम, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; कोल्हापुरातील सात वर्षांपूर्वीचा गुन्हा

By उद्धव गोडसे | Updated: October 1, 2024 16:39 IST

तपास अधिका-यांचे कौतुक

कोल्हापूर : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने आईचा खून करून तिचे काळीज भाजून खाणारा नराधम सुनील रामा कूचकोरवी (वय ३५, रा. माकडवाला वसाहत, कोल्हापूर) याची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली. न्यायाधीश रेवती मोहिते-डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी आरोपीचा अर्ज फेटाळून हा गुन्हा दुर्मिळ आणि अतिशय गंभीर असल्याचे मत नोंदवले. मंगळवारी (दि. १) हा निर्णय देण्यात आला.माकडवाला वसाहत येथे २८ ऑगस्ट २०१७ मध्ये सुनील कूचकोरवी याने आई यल्लाव्वा रामा कूचकोरवी (वय ६३) हिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर चाकूने तिचे पोट फाडून काळीज आणि इतर अवयव काढून ते भाजून खाल्ले. हा घृणास्पद आणि कीळसवाणा प्रकार उघडकीस येताच शाहूपुरी पोलिसांनी सुनील याला अटक केली होती.तत्कालीन पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी तपास करून आरोपपत्र दाखल केले होते. जिल्हा न्यायालयाने ८ जुलै २०२१ मध्ये त्याला फाशीची शिक्षा सुनावली. त्याला आव्हान देत शिक्षेत सवलत मिळण्यासाठी आरोपीने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. मात्र, न्यायाधीश मोहिते-डेरे आणि चव्हाण यांनी आरोपीचा अर्ज फेटाळत त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली.

जेलमध्येही तो असे करेल..आरोपीने केलेला गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ आहे. त्याने केवळ आईचा खून केला नाही, तर तिचे अवयव काढून भाजून खाल्ले. तो जेलमध्येही असे करेल. त्यामुळे त्याला फाशीचीच शिक्षा योग्य असल्याचे मत न्यायाधीशांनी व्यक्त केले.

तपास अधिका-यांचे कौतुकतत्कालीन पोलिस निरीक्षक संजय मोरे, अंमलदार तानाजी चौगुले, सुरेश परीट, सागर माळवे, लक्ष्मण लोहार, आदींच्या पथकाने तपास करून आरोपपत्र दाखल केले होते. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपलब्ध नसतानाही परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षी यावर आरोपीला फाशीची शिक्षा मिळाली. निरीक्षक मोरे यांनी तपास केलेल्या २०१२ मधील मुंबईतील एका गुन्ह्यातही आरोपीला फाशीची शिक्षा झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय