शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील एस्तेर पॅटन मिशनरी शाळेला मोठी परंपरा, पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी शिकल्या याच शाळेत

By संदीप आडनाईक | Updated: December 24, 2024 18:44 IST

शैक्षणिक आणि वैद्यकीय मिशनरींचे काम पाहून कोल्हापूर संस्थानचे सुधारक छत्रपती शाहू महाराजांच्या पूर्वकालीन राजांनीही मिशनरींच्या कामासाठी मोफत जमिनी उपलब्ध करून दिल्या

संदीप आडनाईककोल्हापूर : नागाळा पार्क येथील जिल्हाधिकारी कार्यालयानजीकच्या ख्राइस्ट चर्चलाही मोठी परंपरा आहे. शहरातील ख्रिश्चन परंपरेत भर घालणाऱ्या या चर्चमध्ये दरवर्षी ख्रिस्तजन्माचा देखावा तसेच विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य स्वरूपात आयोजन केले जाते. चर्च कौन्सिलने एस्तेर पॅटन गर्ल्स हायस्कूल परिसरात रे. वायल्डर यांच्या स्मृती जपण्यासाठी हे भव्य चर्च उभारले. या एस्तेर पॅटन शाळेला मोठी परंपरा आहे. या शाळेतच देशातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी शिकल्या.दक्षिण महाराष्ट्रात ख्रिस्ती मंडळींचा पाया घालणारे पहिले मिशनरी रे. रॉयल गोल्ड वायल्डर यांनी धर्मप्रसारासोबत शाळा सुरू करण्यावर भर दिला होता. ब्रिटिश सत्तेच्या अंमलाखाली असलेल्या कोल्हापूर संस्थानने त्यांना मदत केली. वायल्डर यांनी शाळा, बोर्डिंग आणि दवाखाने सुरू केले. या भागातील मागासवर्गीय समाजातील अनेक तरुण शिक्षण घेऊ लागले.शैक्षणिक आणि वैद्यकीय मिशनरींचे काम पाहून कोल्हापूर संस्थानचे सुधारक छत्रपती शाहू महाराजांच्या पूर्वकालीन राजांनीही मिशनरींच्या कामासाठी पूर्व बाजूला मोफत जमिनी उपलब्ध करून दिल्या. वायल्डर यांच्या जागवण्यासाठी केडीसीने हे चर्च उभारले. याचे सुमारे ५०० सभासद आहेत.

कोल्हापूरची पहिली शाळा एस्तेर पॅटनतत्कालीन तिसरे शिवाजी ऊर्फ बाबासाहेब महाराज यांच्या भगिनी आऊबाई आणि बाळाबाई यांच्या साहाय्याने १८५२ मध्ये सुरुवातीला जुन्या राजवाड्यात भरणारी शाळा काही काळाने या विस्तीर्ण जागेत सुरू झाली. काही वर्षांनी एस्तेर पॅटन ही २२ वर्षांची अमेरिकन तरुणी कोल्हापुरात आली. त्यांनी मिसेस वायल्डर यांच्या साहाय्याने मराठी भाषा शिकून छोट्याशा झोपडीत शिक्षणाचे कार्य सुरू केले. प्लेगच्या साथीत त्यांचा कोल्हापुरात मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचे नाव या शाळेला दिले आहे.सरकारी रेकॉर्डप्रमाणे १८७३ मध्ये सुरू झालेली ही शाळा आजदेखील सुरू आहे. या शाळेत मुलींचे स्वतंत्र वसतिगृहही आहे. या शाळेत राजघराण्याबरोबरच सामान्य घरांतीलही अनेक मुलींनी शिक्षण घेतले. पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी याच शाळेच्या विद्यार्थिनी आहेत. त्यांनी अमेरिकेत जाऊन एम.डी.ची पदवी घेतली. त्या परतल्यानंतर कोल्हापुरात अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमधील स्त्री कक्षाचा कार्यभार स्वीकारला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरChristmasनाताळSchoolशाळा