शहरं
Join us  
Trending Stories
1
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
2
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
3
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
4
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
5
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
6
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
7
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
8
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
9
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
10
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
11
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
12
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
13
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
14
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
15
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
16
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
17
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
18
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
19
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
20
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 

खासदार माने-आवाडे यांच्यात रंगले कुरघोडीचे राजकारण; लोकसभेच्या तोंडावर चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2024 12:21 PM

दोन्ही नेते महायुतीचे घटक असताना प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे एकमेकांवर करत असलेल्या कुरघोड्या मतदारसंघात चर्चेचा विषय ठरल्या

कोल्हापूर : खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्यातील शीतयुद्ध काही केल्या संपायला तयार नसल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने हे जगजाहीर झाले आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याचे राजकारण ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्यात सुरू झाले आहे.आमदार आवाडे यांनी गेल्या आठवड्यात शिरदवाड (ता.शिरोळ) येथील कार्यक्रमात लोकसभेचा उमेदवार बदला असे मी नव्हे तर लोकच म्हणत असल्याची टीका जाहीरपणे केली होती. त्याला खासदार माने यांनी संयमी उत्तर दिले. घटक पक्षांची जागेची मागणी असणे गैर नाही. परंतु, जेव्हा उमेदवार जाहीर होईल तेव्हा सर्वजण एकाच व्यासपीठावर असतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला होता. परंतु, त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागताच्या जाहिरातीत मात्र स्थानिक आमदार असूनही आवाडे यांचे छायात्रित वापरलेले नाही. अगदी विनय कोरे, राजेंद्र यड्रावकर यांच्यापासून प्रकाश आबिटकर यांच्यासह तबब्ल १३ नेत्यांची छायाचित्रे आवर्जून वापरली आहेत, परंतु त्यात आवाडे यांच्या छायाचित्रासाठी मात्र जागा मिळालेली नाही. इचलकरंजीजवळ कार्यक्रम असून आवाडे यांचा छायाचित्र वगळण्याचे धाडस खासदार माने यांनी केले आहे.त्याचा वचपा लगेचच आमदार आवाडे यांनीही काढला आहे. त्यांच्या प्रयत्नांतून इचलकरंजीला एमएच-५१ हा नवा नंबर परिवहन विभागाने दिला आहे. त्याच्या जाहिराती आमदार आवाडे यांनी शुक्रवारच्या वृत्तपत्रांत केल्या आहेत. त्यांनीही त्यामध्ये जाणीवपूर्वक खासदार माने यांचे छायाचित्र वगळले आहे. हे दोन्ही नेते महायुतीचे घटक असताना लोकसभेची निवडणूक कधीही जाहीर होईल अशी स्थिती असताना प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे एकमेकांवर करत असलेल्या कुरघोड्या मतदारसंघात चर्चेचा विषय ठरल्या आहेत. या मतदारसंघातून आमदार आवाडे यांचे चिरंजीव राहुल हे लोकसभेसाठी इच्छुक असल्याने तो संदर्भ या राजकारणाला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणichalkaranji-acइचलकरंजीPrakash Awadeप्रकाश आवाडे