शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

‘गोकुळ’च्या अध्यक्ष पदासाठी अरुण डोंगळेंच्या नावाला संचालकांचाच विरोध, नेत्यांसमोर पेच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 12:20 IST

अध्यक्ष विश्वास पाटील यांची मुदत उद्या, रविवारी संपत आहे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्या नावाला संचालकांचाच विरोध असल्याचे समजते. काही संचालकांनी थेट नेत्यांच्या कानावरच ही गोष्ट घातली असून, संघाचा अध्यक्ष करणार असाल तर इतर कोणालाही करा, असा आग्रह धरल्याचे समजते. मात्र, दोन वर्षांनंतर डोंगळे यांनाच अध्यक्ष करण्याचा दिलेल्या शब्दाचे काय करायचे? असा पेच नेत्यांसमोर आहे.‘गोकुळ’मध्ये आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षांपूर्वी सत्तांतर झाले. ‘गोकुळ’मध्ये सत्तांतर घडविण्यात ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व अरुण डोंगळे यांचे बंड महत्त्वपूर्ण ठरले होते. त्यामुळे पहिल्या दोन वर्षांसाठी विश्वास पाटील यांना तर त्यानंतर दोन वर्षे अरुण डोंगळे यांना संधी देण्याची घोषणा त्यावेळी नेत्यांनी केली होती. अध्यक्ष विश्वास पाटील यांची मुदत उद्या, रविवारी संपत आहे. त्यामुळे गेला महिनाभर अरुण डोंगळे यांनी नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. मात्र, डोंगळे यांना अध्यक्ष करण्यास संचालकांचाच विरोध असल्याचे समजते. काही संचालकांनी नेत्यांची भेट घेऊन तसे कानावर घातले आहे. पहिली दोन वर्षे काॅंग्रेसचे विश्वास पाटील यांना संधी दिल्याने आता राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे अध्यक्षपद येणार आहे. राष्ट्रवादीकडून डोंगळे यांच्यासह नवीद मुश्रीफ, प्रा. किसन चौगले, रणजितसिंह पाटील ही नावे पुढे येत आहेत.विरोध कमी करण्यासाठी ‘नवीद’च योग्यसध्या शौमिका महाडिक यांनी ‘गोकुळ’च्या कारभारात अधिक लक्ष देत चौकशी लावली आहे. महादेवराव महाडिक यांचा विद्यमान अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह अरुण डोंगळे यांच्यावर राग आहे. डोंगळे यांना अध्यक्ष केले तर महाडिक ताकदीने पाठीमागे लागू शकतात. त्याऐवजी नवीद मुश्रीफ यांना अध्यक्ष केले तर त्यांचा आक्रमकपणा कमी होऊ शकतो, असे गणितही काही संचालकांनी नेत्यांसमोर मांडल्याचे समजते.

संचालकांसमवेत नेत्यांची आज बैठक

संघाच्या संचालकांसमवेत आज, शनिवारी नेत्यांची बैठक आहे. यामध्ये संचालकांची मते आजमावून घेतली जाणार आहेत. त्यानंतरच अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.तोपर्यंत विश्वास पाटील यांनाच कायम ठेवासंघाच्या मागे लागलेली चौकशी व सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा हालवून जाम केलेला खुट्टा पाहता, यापुढे भाजप आक्रमक होणार आहे. अशा पार्श्वभूमीवर नवीन अध्यक्ष निवड सत्तारुढ गटाला डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे हे शांत होईपर्यंत विश्वास पाटील यांनाच कायम ठेवावे, असा मतप्रवाह पुढे येत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul Milkगोकुळ