शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: अखेर हुपरीतील वादग्रस्त मदरसा हटविण्यास सुरुवात, मुस्लिम बांधवांची मूक निदर्शने 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 12:27 IST

तानाजी घोरपडे हुपरी : येथील यशवंतनगर परिसरातील वादग्रस्त मदरसा जमिनीचा मालकी हक्क शाबूत करणारा पुरावा व बांधकाम परवाना आदी ...

तानाजी घोरपडेहुपरी : येथील यशवंतनगर परिसरातील वादग्रस्त मदरसा जमिनीचा मालकी हक्क शाबूत करणारा पुरावा व बांधकाम परवाना आदी कागदपत्रे मुस्लिम सुन्नत जमियतने नगरपरिषद प्रशासनाला सादर न केल्याने प्रशासनाने या मदरसाचे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही आज, शनिवारी सकाळपासून सुरू केली आहे. दरम्यान ही कारवाई थांबविण्याच्या मागणीसाठी मुस्लिम समाजातील नागरिकानी हातात छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा घेवून काही काळ शांततेत मूक निदर्शने केली. शहरात जागोजागी मोठ्याप्रमाणात पोलिस बंदोबस्त आहे. शहरांतील सरकार गायरान भूमी गट क्रमांक ८४४/अ/१ पैकी मालमत्ता क्रमांक ४४८९ या मिळकतीवर मुस्लिम सुन्नत जमियतने बेकायदेशीररित्या उभारलेल्या मदरसा जमिनीच्या मालकी हक्काबाबतची कागदपत्रे, बांधकाम परवाना व इतर अनुषंगिक कागदपत्रे सादर करण्याची नोटीस नगरपरिषद प्रशासनाने मुस्लिम सुन्नत जामियतला बजावली होती. मात्र मुस्लिम सुन्नत जामियतने शेवटपर्यंत कागदोपत्री पुरावा सादर केलाच नाही. तसेच सरकारी गायरानावरती बेकायदेशीररित्या मदरसाचे बांधकाम केले असल्याचे शासकीय कागदपत्रातून व आत्तापर्यंतच्या न्यायालयीन लढाईतून सिद्ध झाल्याने प्रशासनाने शनिवारी हा वादग्रस्त मदरसा हटविण्याची कारवाई केली. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक निकेश खाटमोडे पाटील, पोलिस उपअधिक्षक समीरसिंह साळवे, प्रांताधिकारी मौसमी बर्डे - चौगुले, अप्पर तहसिलदार सुनिल शेरखाने, मुख्याधिकारी अजय नरळे, पोलिस निरिक्षक एन आर चौखंडे यांच्यासह पोलिसांचा बंदोबस्त आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuslimमुस्लीम