शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राला 'ते' न परवडणारं, जागृत राहून एकमेकांना साथ देऊया; अजित पवारांचं जनतेला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 18:35 IST

शिंदे-फडणवीस सरकार निर्णय घेताना समाजामध्ये जातीय सलोख्याला धक्का लागेल, समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी भूमिका घेत आहे.

दत्ता पाटीलम्हाकवे : आम्ही निवडणुका संपल्यानंतर राजकारणाला फाटा देऊन सर्व समाजाला जाती-पाती, धर्म पंथांमध्ये अडकून न ठेवता युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाप्रमाणे वाटचाल करण्याची मुभा देतो. माञ, गेल्या आठ महिन्यात सत्तेवर आलेले शिंदे-फडणवीस सरकार निर्णय घेताना समाजामध्ये जातीय सलोख्याला धक्का लागेल, समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी भूमिका घेत आहे. हे छञपती शाहू फुले आंबेडकर यासह थोर महापुरुषांच्या महाराष्ट्राला न परवडणारे आहे. त्यामुळे आपण सर्वांनी अधिक जागृत राहून एकमेकांना साथ देऊया असा निर्धार विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.केनवडे (ता. कागल) येथील १ कोटी रुपयांच्या फ्युच्युरिस्टिक क्लासरूमच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार हसन मुश्रीफ होते.अजित पवार म्हणाले, राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना शुन्य टक्के व्याजदराने कर्ज, प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेतला होता. अद्याप काही शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालेले नाही. ते सर्वांना मिळेपर्यंत आपले प्रयत्न सुरू राहतील असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.आमदार सतेज पाटील म्हणाले, येणारे युग हे तंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे त्याची सुरुवात कागल तालुक्यातून होत आहे ही कौतुकास्पद बाब आहे.आमदार मुश्रीफ म्हणाले, शिक्षकांनी अपडेट होवून मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी नेहमीच सतर्क राहावे. प्रास्ताविक माजी सरपंच दत्ता पाटील-केनवडेकर यांनी केले. यावेळी माजी आमदार संजय घाटगे, आमदार राजेश पाटील, के.पी.पाटील, ए.वाय.पाटील, नविद मुश्रीफ, प्रविण भोसले, मनोज फराकटे, शशिकांत खोत, सरपंच अनुराधा शिंदे आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे