कोल्हापूर : जवाहरनगरातील सरनाईक वसाहत येथील गृहप्रकल्पासाठी खुदाई केलेल्या खड्ड्यात पडून पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू म्हणजे महानगरपालिका अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिकाच्या निष्काळजीपणाचा बळी असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणाशी संबंधित अधिकारी, बांधकाम व्यावसायिकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात येत आहे.सरनाईक वसाहत येथील रि.स.नं. ६२४/२, व ६२३/३/४ बी वॉर्ड येथे गृहप्रकल्प उभारण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाने खुदाई केली होती. हा गृहप्रकल्प साकारताना डी.पी. रोड वळवून बांधकाम परवानगी घेतली. तक्रारी होताच नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा बांधकाम परवाना नंतर नामंजूर केला. तोपर्यंत बांधकाम व्यावसायिकाने गृहप्रकल्पासाठी खड्डे खोदले होते. बरेच काम झाल्यानंतर महापालिकेने नोटीस बजावून काम थांबविले. ठेकेदाराने काम थांबविले; पण खड्डे आजपर्यंत तसेच राहिले. त्यात पाणी साचल्याने नागरिकांचा जीव, आरोग्यही धोक्यात आले.नगररचना विभागाचे उपशहर रचनाकार यांनी १ नोव्हेंबर २०२५ रोजी खड्डे तत्काळ बुजवून घ्यावेत. तसे न केल्यास काही अनुचित प्रकार घडल्यास आपण जबाबदार राहाल अशी नोटीस बजावण्यात आली. तरीही त्याने महापालिका यंत्रणेला जुमानले नाही. परिणामी निष्पाप बालकाचा बळी गेला.डी.पी.रोडवर परवानगी दिलीच कशी?महानगरपालिकेने तयार केलेल्या डी.पी.मध्ये १२ मीटरचा रस्ता दाखविण्यात आला असतानाही कशाच्या आधारे बांधकाम परवानगी दिल्याचा जाब माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी विचारला. शेटे यांनी लक्ष घालताच नगररचना विभागाचे अधिकारी सजग झाले आणि डी.पी. रस्ता याची मोजणी करण्याबाबत भूमिअभिलेख कार्यालयात अर्ज केला; परंतु त्याची मोजणी अद्याप प्रलंबित आहे.
शाळेच्या शेजारीच खड्डेया मोठ्या खड्ड्यात पाणी साचले आहे. त्यावर प्रचंड प्रमाणात शेवाळ निर्माण झाले आहे. त्यामुळे ते मैदान असल्याचा भास होतो. त्याच्या शेजारीच एक शाळा आहे. तेथे मुलांचा वावर आहे. त्यामुळे आणखी कोणाचा बळी जाण्याआधीच खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिकांनी ’लोकमत’कडे केली.
महापालिका अधिकारी, बांधकाम व्यावसायिकाच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा बळी गेला आहे, म्हणून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा. - भूपाल शेटे, माजी उपमहापौर
बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल कराकोल्हापूर : बांधकामासाठी खड्डा काढून तो धोकादायक स्थितीत ठेवल्याप्रकरणी संबंधित बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मृत बालकाच्या नातेवाईकांनी गुरुवारी राजारामपुरी पोलिसांकडे केली.खेळण्यासाठी घरातून बाहेर पडलेला इजान बारगीर हा घरापासून जवळ असलेल्या खड्ड्यात पडून बुडून दगावला. बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेनंतर सरनाईक वसाहत परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. मृत बालकाच्या नातेवाईकांसह काही नागरिकांनी गुरुवारी राजारामपुरी पोलिस ठाण्यात जाऊन खड्डा खोदणा-या बांधकाम व्यावसायिकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला. सुमारे २० ते २५ फूट खोल खोदलेला खड्डा धोकादायक स्थितीत आहे. जवळच शाळा असल्याने सुमारे ७०० विद्यार्थ्यांचा याचा धोका आहे. दुर्घटना घडण्याचा धोका असल्याची जाणीव असूनही संबंधित बांधकाम व्यावसायिकाने खड्ड्याभोवती कुंपण घातलेले नाही. निष्काळजीपणाबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील यांच्याकडे सोपवला असून, चौकशी करून पुढील कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Web Summary : A five-year-old boy tragically died in a pit dug for a housing project in Kolhapur due to negligence. The pit was left open and filled with water. Locals demand legal action against negligent officials and the builder.
Web Summary : कोल्हापुर में एक हाउसिंग प्रोजेक्ट के लिए खोदे गए गड्ढे में गिरने से पांच वर्षीय बालक की दुखद मौत हो गई। गड्ढा खुला छोड़ दिया गया था और उसमें पानी भर गया था। स्थानीय लोगों ने लापरवाह अधिकारियों और बिल्डर के खिलाफ कानूनी कार्रवाई की मांग की है।